logo

गाणी ऐकल्यास होणार शिक्षा, रेल्वे प्रवासावर कायमची बंदी आणि कारावास...; Indian Railways च्या नियमांकडे अजिबात दुर्लक्ष नको......

ndian Railways Rules for Passengers : जगभरात चौथ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं अशी ओळख असणाऱ्या भारतीय रेल्वे विभागानं काळानुरूप सेवांमध्येही काही महत्त्वपूर्ण बदल करत प्रवाशांच्या हिताचाच विचार केला आहे. अशा या रेल्वेच्या बहुविध सेवांचा लाभ घेत दर दिवशी कोट्यवधी प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. दर दिवसाचं गणित पाहिल्यास साधारण 13 हजार ट्रेननं दररोज रेल्वेनं 4 कोटी नागरिक प्रवास करतात आणि या प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांनी या विभागानं आखून दिलेली कामं करणं अपेक्षित असतं. 
रेल्वे प्रवासादरम्यान प्रशासनानं आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झाल्यास याची शिक्षासुद्धा प्रवाशांना भोगावी लागू शकते. इतकंच नव्हे, तर काही नियमांचं उल्लंघन करणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं प्रवाशांना थेट कारागृहाची वाट दाखवण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळं हे नियम चुकूनही विसरु नका. पाहा त्याचबद्दलची माहिती, थोडक्यात... 

धुम्रपान केल्यास थेट कारावास 

सुरक्षिततेच्या हेतूनं रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे प्रवासादरम्यानही धुम्रपान करणं प्रतिबंधित आहे. त्यामुळं रेल्वे प्रवासादरम्यानही तुम्ही मद्यपान किंवा धुम्रपान करताना दिसलात तर ही कृती दंडपात्र ठरू शकते. इतकंच नव्हे, तर प्रकरण बिघडल्यास प्रवाशांना थेट तीन वर्षांचा कारावासही भोगावा लागू शकतो. 

गाणं ऐकणंही गुन्हा? 

रेल्वे नियमांनुसार रात्रीची वेळ ही प्रवाशांसह सर्वांच्याच विश्रांतीची वेळ असून, या वेळेत मोठमोठ्यानं बोलणं असो किंवा अगदी मोठ्या आवाजात गाणी ऐकणं असो. ही कृती प्रवाशांना संकटात टाकू शकते. जिथं सुरक्षा कर्मचारी प्रवाशांना दंड ठोठावून त्यांना रेल्वेतून खालीसुद्धा उतरवू शकतात. 

विनातिकीट प्रवास 

भारतीय रेल्वेमध्ये तिकीटीशिवाय प्रवास करणं शिक्षेस पात्र आहे. हा एक दंडनीय अपराध असून, जर एखाद्या प्रवाशाला तिकीटाशिवाय रेल्वेनं जाताना टीसी अथवा टीटीईनं पकडलं तर त्यांना मोठी रक्कम दंड स्वरुपात भरावी लागते. किंवा काही प्रवाशांना कायमस्वरुपी रेल्वे प्रवास नाकारला जातो. 

चुकीच्या वस्तू सोबत आणू नका 

भारतीय रेल्वेमध्ये आखण्यात आलेल्या नियमांनुसार ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची स्फोटकं किंवा ज्वलनशील पदार्थ सोबत आणू नये. असं केल्यास प्रवाशांना 1 हजार रुपयांचा दंड आणि 3 वर्षांचा कारावास अशी शिक्षा भोगावी लागू शकते. 

92
4329 views