logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भरधाव कारने चौघांना उडवले मद्यधुंद चालकाचा प्रताप

उमरखेड : मद्यधुंद अवस्थेत

भरधाव वेगाने कार चालवत असताना रस्त्यात येणाऱ्या दुचाकी वाहनासह पादचारी महिलेस उडवून पळून जात असताना कार पलटी झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला सदर घटना आज दुपारी १२ वाजता चे दरम्यान उमरखेड पुसद रोडवर घडली या घटनेत एक महिला गंभीर तर तिघे जखमी झाले असून पोलिसांनी कार चालकास अटक केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुसद रोड वरील बेलखेड येथून उमरखेड येथील दत्तनगर येथे मध्य धुंद अवस्थेत कारचालक अभिषेक राठोड वय 27 रा दत्तनगर उमरखेड हा इंडिको गाडी क्रमांक एम एच 04 डी वाय 54 38 ही गाडी भरता वेगाने चालवत

एक गंभीर तर तिघे जखमी

असताना शहरातील पुसद अर्बन बँकेसमोर मोटर सायकल स्वार गणेश राजाराम शिंदे रा. उमरखेड व अजय बालाजी वंजारे यांच्या मोटर सायकल ला पाठीमागून धडक दिली त्यानंतर गुनीबाई होशीबा राठोड वय ५१ या पादचारीस महिले धडक घेऊन आता आपण पकडले जाणार या भीतीने महागाव रोड ने जात असताना त्या ठिकाणी सुनील

जनार्दन कराळे यांच्या दुचाकीला मागून धडक देऊन समोर जात असताना महामार्गावरील हॉटेल आदित्य समोर गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी पलटी झाली. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळावर जाऊन वाहन चालक अभिषेक राठोड या ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

172
9052 views

Comment