logo

महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रूपाली चाकणकर यांनी घेतलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!!

जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!!

महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या माध्यमातून जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार,ग्रामीण आणि शहरी पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी,गटविकास अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.त्यावेळी ग्रामीण आणि शहरी भागातून अनेक नागरिक आपापल्या तक्रारी घेऊन आलेले होते.यावेळी लोकांच्या तक्रारी समक्ष ऐकून घेऊन सोडवण्यात आल्या.

ग्रामीण भागातील समस्यांमध्ये तहसीलदारांकडे अशी तक्रार करण्यात आली की,सातबारा उताऱ्याचे री रायटिंग करताना ज्या चुका शासनाकडून होतात,त्या चुका शासनाने दुरुस्त केल्या पाहिजेत. त्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये.जी पोकळीस्थ नाव शासनाच्या चुकांमुळे लागतात ती शासनाने दुरुस्त करून दिली तर शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होईल अशा प्रकारची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली. अशा प्रकारच्या चुका तलाठी कार्यालयातून जाणीवपूर्वक होत असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत,अशा विषयांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे.

त्याचबरोबर महिलांच्या कौटुंबिक समस्या,महानगरपालिकेच्या संदर्भातील समस्या,इतर कोणत्या गुन्ह्यातील पोलिसांच्या संदर्भातील समस्या या सगळ्या समस्यांचे अर्ज घेण्यात आले व त्याची व त्या सगळ्यांचे समाधान जनता दरबारात करण्यात आले.

यावेळी सिंहगड पोलीस स्टेशन, नांदेड सिटी पोलीस स्टेशन आणि राजगड पोलीस स्टेशन येथील PI, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी,महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पोकळे,जिल्हा परिषद चे मा.उपाध्यक्ष शुक्राचार्य भाऊ वांजळे,खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ,ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र पवार, खडकवासला मतदारसंघाचे उपाध्यक्ष विकास हगवणे शुभांगी खिरीड,सागर कोल्हे,भावना पाटील,शशिकांत किवळे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,
खडकवासला मतदार संघ.

60
6120 views