logo

साप्ताहिक पिंगलाक्षी एक्सप्रेसचे संपादक गजानन बानोरे यांना समाज सेवा पुरस्कार जाहीर

साप्ताहिक पिंगलाक्षी एक्सप्रेस चे संपादक गजानन बान्नरे यांना समाज सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
महेंद्र महाजन
:-रिसोड तालुक्यातील नेतंसा येथील छत्रपती संभाजी महाराज जयंती निमीत्त मराठा स्नेहसंवर्धक मंडळाच्या वतीने व रामतीर्थ संस्थानचे वतीने मराठा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन १८ मे रोजी करण्यात आले होते.
या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून केंद्रीय आयुष्य स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव होते. तर स्वागताध्यक्ष पदी डॉ. राम शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा समाज भूषण डॉ. भूषण मापारी, उद्योजक देवेंद्र खडसे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, आ. अमित झनक, ज्योतीताई गणेशपुरे, रा. काँ. प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे, डॉ. गजानन बाजड, डॉ. अजय पाटील, वसंतराव धाडवे, प्राचार्य वसंतराव अवचार यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.याप्रसंगी विविध समाजातील सामाजिक कार्य करणार्‍या महिलांचा व नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.पत्रकार गजानन बानोरे हे गेल्या ३५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असल्याबद्दल त्यांना डॉ. राम शिंदे व डॉ. भूषण मापारी यांच्या हस्ते ‘‘समाज सेवा’’ पुरस्काराचे शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विनोद बोरे तर आभार दिनकर बोडखे यांनी मानले.

10
57 views