logo

अभिनेता प्रमोद पंडित यांना नाशिक मधुन चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित ..

सिनेसृष्टी - चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृतिदिन सन्मान 2025 कलावंत विचार मंच कमल फिल्म फाउंडेशन व कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त व विद्यमाने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृतिदिन पुरस्कार 2025 साठी निवड पत्र अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना मिळाले त्याबद्दल त्यांना सामाजिक व कलाक्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले .अभिनय क्षेत्रात चांगल्या दर्जाचे काम करत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही विधवा व ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष यांच्यासाठी ज्या योजना सरकार दरबारी असतील त्या त्यांच्यापर्यंत जाऊन मदत करण्याचा अतोनात प्रयत्न नेहमी करत असतात काम करतात फिल्म क्षेत्रात ते नेहमी नवनवीन कलाकारांना आपल्या गाण्याच्या माध्यमातून त्यांना काम देऊन त्यांना स्टेज उपलब्ध करून देऊन सिरीयल अथवा फिल्म मध्ये काम मिळवून देतात असे त्यांच्या कामाची पावती म्हणून चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं आहे. खरं बघायला गेलं तर कलेचा झाला बाजार आपण नेहमी सिनेमातील कलावंतांना पाहून अनुकरण करत असतो त्यांच्या कलेतून आपण नेहमी वास्तव पाहत असतं खऱ्या कलावंताला सध्या इन्स्टा च्या जाळ्या चा फटका बसला आहे कमी मेहनतीचा व सोशल नेटवर्किंग चा दुष्परिणाम खऱ्या खुऱ्या मेहनतीने आपली कला सादर करणाऱ्या कलावंतावर होत आहे तमाशा कलावंत अथवा स्टेज कलावंत यांच्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली अक्षरशा त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सरकारने अशा कलाकारांना मानधनाचा विचार करावा जेणेकरून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हा अध्यक्ष प्रमोद पंडित कलाकारांच्या बाजूने उभे असतात सिनेमा वेब सिरीज अडचणीत येऊ नये यासाठी ते नेहमी सदर प्रयत्नशील असतात यापुढे चित्रपट करणे खूप अवघड समस्या झाली आहे कारण प्रेक्षकांनी आपला कल हा मोबाईल वरील रिल्स कडे आकर्षित केलेला दिसतो यामुळे भविष्यात इन्स्टा रिल्स वरील आपली कला कमी वेळात भरपूर प्रसिद्धी व प्रसार यामुळे आपण स्टार कसे होऊ या स्पर्धा चालली आहे या तरुण अथवा महिला पुरुष यांनी ईस्टाचा दुरुपयोग करून चांगल्या प्रेक्षकांना आपल्याकडे वळवले आहे त्यामुळे चित्रपट अथवा चांगले वेब सिरीज न पाहता लोक अश्लील वेबसाईट व्हिडिओ इन्स्टा रिल्स कडे जास्त आकर्षित होत आहे त्यामुळे वाईट गोष्टींना वाव मिळतो .खूप गुन्हेगार वाढत चालले आहे समाजात दोन प्रेक्षक वर्ग तयार झाली आहे एक म्हणजे चांगल्या कलाकारांना वाव देणारा दुसरा म्हणजे वाईट कलाकारांना प्रोत्साहन देणारा कलाकारांचा वेब सिरीज च्या माध्यमातून काम देण्याचा नेहमी प्रयत्न असणार आहे अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी खंत व्यक्त केली आपली भावना मांडली.

21
1684 views