logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांचे फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पैठण प्रतिनिधी :सुभाष मस्के मंगळवार ता(.20)ला दुपारीच चार ते पाच वाजेच्या सुमारास अचानक आवकाळी पावसाला सुरुवात झाली .कच्ची शेकडो घरे विजेचे खांब जमीन उद्ध्वस्त झाले फळबागाचे मोठ्यात प्रमाणात नुकसान झाले.वडजी गावातील जिल्हा परिषद शाखेचे पत्रे उडवून जवळपास दोनशे फुट अंतरावर जाऊन पडले.अचानक आलेल्या आवकळी पावसाने वडजी परिसरात एक खळबळ उडाली वडजी गावातील अनेक लोकांच्या घराच्या भिती पडल्या तर आणेकाच्या घरात पावसाचे पाणी शिरले तर थेरगाव, वडजी,लिमगाव,पाचोड खंडाळा,या गावात मंगळवारी
चार वाजेपासून वादळी वाऱ्यासह पाऊसाला सुरुवात झाल्यामुळे.मोसंबी, डांळीब,लिब,बकान,बाभुळ याच्या फाद्या तुटून पडल्या तर काही.झाडे बुडापासुन उपटून जमीन उद्ध्वस्त झाली .थेरगाव मधील काही शेतकऱ्याचे पत्र उडाले तर काही केळीचे बाग उद्ध्वस्त झाले.या परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.वडील येथे कृष्णा भांड याचे अशोक भांड याचे डांळीबाचे बाग फार मोठे नुकसान झाले.तर,थेरगाव येथे मोसंबीच्या बागासह बाजरीच्या पिके पपई च्या बागासह अनेक फळबागाचे नुकसान झाले.तोंडाला आलेला घस आवकाळी पावसाने हिरावून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहे.
मदन म्हणुन तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक शासनाने द्यावी

105
10348 views

Comment