logo

संभाजीनगर येथे लोकशाही पत्रकार संघाची विभागीय बैठक संपन्न;


संभाजीनगर: लोकशाही पत्रकार संघाचे आज मराठवाडा संभाजीनगर येथे सुभेदारी रेस्ट हाऊस येथे दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेले तथा लोकशाही संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरीभाऊ नाना बागडे साहेब त्यांच्याशी आज संभाजीनगर निवास स्थानी भेट घेऊन संभाजीनगर या ठिकाणी येत्या जून महिन्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्काराचे कार्यक्रम घेऊन पुरस्कार कर्त्याला सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच साप्ताहिक वृत्तपत्र युवती राज हे वृत्तपत्र पुणे या ठिकाणी सुरू होणार असल्याचे मुख्य संपादक भागवत वैद्य यांनी म्हटले.तसेच आज पुणे जिल्हा उपसंपादक पदी हलीमा शेख यांची निवड तर पुणे जिल्हा प्रतिनिधी पदी श्री पांडुरंग साळुंखे यांची निवड करण्यात आली. तसेच दोघांना शुभेच्छा देत असताना संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य सर महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आयुब खान पठाण यांनी कामाचे कौतुक करून आमच्या पाठीवर थाप देऊन दोघांनी आम्हाला आशीर्वाद दिले. पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. दोघांनी महाराष्ट्रभर चांगलं काम करा, लोकांचे प्रश्न मांडा आणि त्यांना समाजात न्याय द्यायचा काम करा. समाजात घटकांना अन्याय अत्याचाराला वाचा फोडून त्यांना न्याय द्यायचं काम करा. हे विश्वास आम्हाला दिले ते विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या कामाचे पावती म्हणून आम्ही नेहमी त्यांचे कामाचे दखल घेऊन काम
करा याचा विश्वास त्यांना दिले.तसेच
लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य च्या वतीने राजस्थान चे महामहीम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे साहेब यांचा सत्कार करून लोक रत्न पुरस्कार उपस्तित राहण्याची वेळ आणि तारीख घेण्यासाठी सं. अ. बीबी वैद्य, प्रदेश अध्यक्ष प्रताप साळुंके, महिला अध्यक्ष निलोफर शेख, प्रदेश उपाध्यक्ष वशिम आजाद, अनिस कुरेशी, महिला प्रदेश उपाध्यक्ष हलिमा शेख,संभाजीनगर महिला जिल्हा अध्यक्ष राणी झुंजूर्डे, पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग साळुंखे आदी पदाधिकारी उपास्तीत होते.

71
3754 views