logo

छत कोसळून महिला कर्मचाऱ्यासह कुटुंब जखमी

गंगापूर प्रतिनिधी मुन्ना भाई:
गंगापूर येथील पंचायत समितीच्या परिसरात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्य शासकीय निवासस्थानाचे छत कोसळून पंचायत समितीच्या कर्मचारी कनिष्ठ सहाय्यक कल्पना कोतकर तसेच आई, वडील व नात गंभीर जखमी होऊन बालंबाल बचावल. पंचायत समितीच्या परिसरात शासकीय निवासस्थान बांधण्यात आले.बांधकाम होऊन जवळपास पन्नास वर्षे झाल्याने हे निवासस्थान जीर्ण होऊन मुदतबाह्य झाले आहे. सततच्या पावसामुळे सात क्रमांकाच्या काच्या निवासस्थानात वास्तव्यास असलेल्या कल्पना कोतकर तसेच आई, वडील व नात झोपी गेले होते. सतत पाऊस सुरू असल्याने निवासस्थानाचे छत कोसळून त्यांच्या अंगावर पडल्याने यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले.

33
794 views