
खामगाव ते छ .संभाजी नगर बससेवा ५ वर्षा नंतर सुरू झाली. आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नाला यश
प्रतिनिधी जुबेर शाह
साखरखेर्डा : गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली खामगाव संभाजीनगर बससेवा आज दि 1 जून पासून पुर्ववत सुरु करण्यात आली आहे.
साखरखेर्डा येथून जालना संभाजीनगर जाण्यासाठी सकाळी सहा नंतर बस उपलब्ध नव्हती सिंदखेडराजा, जालना, संभाजीनगर येथे उपचारार्थ तथा शैक्षणिक कामासाठी जाण्याची बसेस अभावी प्रवाशांची तारांबळ उडायची दरम्यान मारोती मंडळकर, सर्जेराव मंडळकर, आशिष पोंधे आदींनी आ मनोज कायंदे यांचेकडे सदर मागणी केली दरम्यान मनोज कायंदे यांनी तत्परता दाखवत खामगाव आगाराकडे पाठपुरावा केल्यानंतर सदर बससेवा आजपासून सुरू झाली आहे. सदर बस ही खामगाव येथून सकाळी 6.30 वा निघणार असून साखरखेर्डा येथे दहा वा पोहोचणार असून परत संभाजीनगर येथून 12.30 वा निघून साडेचार वा साखरखेर्डा येथे परतणार आहे. दरम्यान साखरखेर्डा येथे बस आल्यावर चालक गुरूदत्त पेसोडे, वाहक वैशाली तायडे यांचा संतोष बोबडे, सर्जेराव मंडळकर यांनी सत्कार केला. दरम्यान आ मनोज कायंदे व खामगाव आगार व्यवस्थापक संजय आकोट यांचे आभार मानले आहे.
शेगाव परतूर आणि खामगाव संभाजीनगर बससेवा ह्या दोन्ही बसेसची वेळ ही एकच येत असल्याने परतूर शेगाव आणि मेहेकर संभाजीनगर ह्या बसेफेऱ्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे खामगाव संभाजीनगर ही बसेस दीड तास उशीरा सोडण्यात यावी असे झाल्यास मेहेकर संभाजीनगर व शेगाव परतुर ह्या बसेसच्या उत्पादनात घट होणार नाही. अशी प्रवाशांची मागणी