logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

श्री सिद्धेश्वर विद्यालय कोलारा येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन संपन्न…

दिनांक ३१ मे २०२५ रोजी विद्यालयात सन १९९८ - ९९ च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी ९:३० वाजेपासूनच या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्याप्रमाणे शाळा दिवसभर चालते त्याप्रमाणे या माजी विद्यार्थ्यांनी वर्गात जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. परिचय सत्र झाले. त्यानंतर समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री गणेश नालींदे सर होते. सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला शाळेचे सन्माननीय सल्लागार साहेबरावजी पाटील, डॉ .दामोधरजी भवर, नामदेवरावजी सपकाळ, गुलाबरावजी सोळंकी तसेच माजी शिक्षक श्री दिनकरराव अंभोरे सर, श्री भास्करराव सरोदे सर, श्री जगन्नाथजी वानखेडे सर, श्री जगताप सर, श्री रामेश्वरजी कुटे सर, श्री सस्ते सर, श्री अनंतराव गव्हले सर, श्री मंजूळकरजी हे उपस्थित होते. यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच शाळेतील आजी शिक्षकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ विठ्ठल काळुसे, सौ संचिता सोळंकी , संजयजी खंडारे संतोष सपकाळ या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच त्या बॅचला असणारे शिक्षक प्राचार्य श्री रामेश्वर जी कुटे , प्राध्यापक श्री रमेशजी जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच या बॅच च्या काही जुन्या आठवणी जसे स्नेहसंमेलनातील गीत ,नाटक ,वर्गातील काही मुलांच्या आठवणीला या शिक्षकांनी उजाळा दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नालींदे सर यांनी आपल्या समारोपीय भाषणातून सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले तसेच भावी आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या व शाळेला ज्या ज्या वेळेस आपल्या मदतीची गरज असेल त्या त्या वेळेस आपण मदतीचे हात पुढे करण्याचे आवाहन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री अनिल दोतोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामेश्वर सोळंकी यांनी केली या कार्यक्रमासाठी ५७ माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मनीष खत्री ,श्री सिद्धेश्वर भवर व रामेश्वर शिवदास बोरसे, बळीराम सपकाळ, मोहन सोळंकी, दिलीप सोळंकी, भगवान सोळंकी इतर सर्व वर्ग मित्र मैत्रिणींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले भोजनोत्तर विविध खेळानंतर नाना विविध आठवणींना उजाळा देत या कार्यक्रमाची सांगता झाली.

132
4262 views

Comment