logo

* पहूर येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न * आदिवासी एकता समिती व आदिवासी तडवी भिल्ल बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने विवाह सोहळा संपन्न

* पहूर येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न *
पहूर तालुका जामनेर प्रतिनिधी :-
नुकताच आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा विवाह सोहळा संपन्न झाला आदिवासी एकता समिती व आदिवासी तडवी भिल्ल बहुउद्देशीय विकास संस्था पहुर यांच्या मार्फत महात्मा फुले माळी समाज मंगल कार्यालयात सामूहिक विवाह चे आयोजन करण्यात आले होते सामूहिक विवाह सोहळ्यात सुमारे दहा जोडपे विवाहबद्ध झाले, प्रत्येकी नव वधू- वरांना संसार उपयोगी गादी पलंग भांडी कपाट शिलाई मशीन वस्तू वाटप करण्यात आल्या, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा जळगाव शहर प्रमुख अरविंद भाऊ देशमुख यांनी नव वधू-वरांना शुभेच्छा दिल्या, यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती प्रदीप लोढा, एडवोकेट एस आर पाटील, एडवोकेट रणजीत तडवी फिरोज तडवी, फारुख शेख, राजू तडवी, मुजाहिद सुरवतने इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रम स्थळी पहूर पेठ चे लोकनियुक्त सरपंच अबू तडवी , राजधर पांढरे, अकबर तडवी, जाकिर तडवी, जलाल तडवी, मुस्तफा तडवी पत्रकार संतोष पांढरे, आरिफ तडवी, अमोल भोई , आदी समस्त तडवी समाज बहुसंख्येने हजर होते कार्यक्रम यशस्वी साठी मुजाहिद सुरतने, फिरोज तडवी, राजू तडवी ,जब्बार तडवी ,आदींनी परिश्रम घेतले

1
149 views