logo

AIMIM महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजीद‌ बिल्डर यांची साखरखेर्डा येथे भेट आगामी प.समिती व जि.परीषद निवडणूकीच्या संदर्भात चर्चा


प्रतिनिधी जुबेर शाह

साखरखेर्डा: आगामी निवडणुका समोर असून सर्व पक्षानी कंबर कसली आहे पंचायत समिती व जिल्हा परीषद लढण्यासाठी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुस्लीमीन पक्षाने देखील तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. एआय एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा बुलडाणा जिल्हाचे पक्ष निरीक्षक समीर सजीद बिल्डर हे आज बुलडाणा दौऱ्यावर होते.या दौऱ्यानिमित्त त्यांनी साखरखेर्डा येथे भेट दिली.आगामी पंचायत समिती व जिल्हा परीषद निवडणूक संदर्भात साखरखेर्डा येथे पक्ष कार्यकर्त्याशी बोलतांना पक्षाचे जिल्हाध्यक्षसह‌ जिल्हाभरातील कार्यकारणी‌‌ लवकरच नियुक्त केली जाणार असून एमआयएम पक्ष राज्यात पक्ष संघटना मजबुत . पंचायत समिती व जिल्हा परीषद निवडणुका लढविणार आहे त्याची तयारी सूरु आहे. मेहकर लोणार विधानसभा नेते नागवंशी संघपाल पनाड,माजी जिल्हाध्यक्ष दानीश शेख त्यांच्या सोबत होते.यावेळी तलुक्का उपाध्यक्ष युनुस शाह, शहेर अध्यक्ष अस्लम शाह, आसिफ कुरेशी,जुबेर पठाण,युसुफ शाह, आयाज पटेल, जाबाज खान सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

176
11275 views