logo

आर पी जी फाऊंडेशन जुनेवाणी तर्फे कपास बॅग चे निःशुल्क वितरण

नागपूर ग्रामीण: काटोल
आर पी जी फाऊंडेशन जुनेवाणी
तर्फे
कपास बॅग चे निःशुल्क वितरण
६ जून २०२५
ला प्रोडूसर कंपनी सिरसावाडी
च्या वतीने जुनेवाणीतील शेतकऱ्यांना पॉरतेक कपास बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी आदिवासी सेवा सहकारी सोसायटी चे संचालक तथा पोकरा कमिटीचे सदस्य श्री नीलकंठ गजभिये यांच्या हस्ते बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी विक्रम जाधव कार्यक्रम व्यवस्थापक उपस्थित होते. कृषी सखी सूर्यकांता कौरती, माजी ग्रा. प. सदस्य कविताताई गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गावातील शेतकरी सिंधू चिंचोरिया, शोभा आहाके,सविता गौरखेडे,मैना कौरती,देवेंद्र सोहलीया,ओंकार कौरती,पुरुषोत्तम पाटील,टीकाराम युवननाते,गणेश येवले, भिमसिंग कंगाली,रमेश येवले, हरिचंद ढोके,रामचंद बोढाले,संजय कौरती ईत्यादि शेतकऱ्यांना पेरणी साठी कपास बॅगचे वितरण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फील्ड ऑफिसर विलास तागडे यांनी परिश्रम घेतले.

40
3859 views