logo

शहापूर शिरगांव सुजाता मडके हीची शास्त्रज्ञ उंच भरारी!

यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. तुम्हाला सरळ मार्गानेच यश मिळवता येते. त्यासाठी खूप जास्त मेहनत,जिद्द, चिकाटी आणि अभ्यास करावा लागतो. असंच काहीसं शहापुरच्या सुजाताने केलं आहे. तिने मोठी झेप घेतली आहे. तिने इस्त्रोत शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळवली आहे. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील (शिरगांव) या लहानशा गावातील सुजाताची ही गरुडझेप ठाणे जिल्ह्यात कौतुकाचा विषय बनला आहे. सुजाता रामचंद्र मडके हिची इंडियन रिसर्च सेंटर (इस्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. सुजाताच्या संशोधनातून ठाणे जिल्ह्याचा झेंडा आता इस्रोमध्येही झळकणार आहे.अभिनंदन सुजाता आपण देशाचे,गावाचे, आईवडील यांचे ही नाव मोठे केलेत आपली उंच भरारी आणखीन उंचीवर जावो आपणास सर्व स्थरांतून खूप शुभेच्छा चा वर्षाव होत आहेत!

51
2799 views