
श्री अमित भोसले व सहकारी यांनी गरीब कुटुंबाला कंपनीद्वारे करून दिली मदत.
काल दिनांक-09/06/2025 रोजी लोणावळा शहरातील क्रांतीनंतर विभागातील एका गरीब कुटुंबातील श्री.दत्तात्रय कोळसकर हे बारा बंगला येथील automatic pvt.ltd. ह्या कंपनीत मागील सहा महिन्यांपासून कार्यरत असताना आज अचानक चक्कर येऊन पडून डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत होऊन दुःखद असे निधन झाले.
सदर व्यक्तीच्या नातेवाईकांचा मनसे अध्यक्ष निखिल भोसले यांना तात्काळ फोन आला असता मनसेचे अध्यक्ष निखिल भोसले,अमित भोसले,दिनेश कालेकर,संदिप बोभाटे,अभिजित फासगे,मधुर पाटणकर आदी पदाधिकारी संजीवनी हॉस्पिटल मध्ये तात्काळ दाखल झाले असता कंपनी आणि पिडीत कुटुंबिय यांच्या मध्ये वाद चालू होता.कंपनी ही कामगार कायद्याच्या अंतर्गत सर्व बाजू पडताळून पाहून ह्या प्रकरणात कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार न्हवती.
कंपनीला मनसेने मनसे स्टाईलने धारेवर धरले असता कंपनीने आपली भूमिका मवाळ करत भरपाई देण्याची तयारी दाखवली.आणि मयताच्या तिन्ही लहान मुलींसाठी प्रत्येकी 1 लाख प्रमाणे 3 लाख देण्याचे कबूल केले.कंपनीचे मालक श्री.शरद भाट साहेब हे मुंबई चे असल्याकारणाने मनसेचे नेते आदरणीय श्री.नितीन सरदेसाई साहेब तसेच बाबू वागस्कर साहेब यांची सुद्धा सदर प्रकरणात आम्हाला मदत झाली.
आज रोजी ह्या मदतीचा धनादेश मयताची पत्नी आणि मुली यांना कंपनीचे अधिकारी व मनसेचे श्री. रमेश म्हाळस्कर,दिनेश कालेकर,अमित भोसले,मधुर पाटणकर,अभिजित फासगे,विपुल माने, संदिप बोभाटे, विश्रांत साठे,सुनिल सोनवणे, सुभाष रेड्डी, श्रेयस कांबळे, कैवल्य जोशी आदी पदाधिकारी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.मनसेच्या वतीने कंपनीचे मालक श्री.शरद भाट साहेब यांचे मनसेच्या शब्दाला मान देऊन पीडित कुटुंबाला मदत केल्याबद्दल आभार मानण्यात आले.
तसेच मनसे लोणावळा शहर हे कोळसकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून पुढे ह्या कुटुंबीयांच्या सोबत राहील असा शब्द कुटुंबीयांना मनसेच्या वतीने देण्यात आला.