logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

एन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बॅंक, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने परीसरातील शेतकऱ्यांसाठी "कृषी मार्गदर्शन सेमिनार - २०२५" चे आयोजन

*आपल्या एन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बॅंक, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने परीसरातील शेतकऱ्यांसाठी "कृषी मार्गदर्शन सेमिनार - २०२५" चे आयोजन मंगळवार दि. १०/०६/२०२५ रोजी सकाळी १०:०० वा. करण्यात आले होते.*

*या सेमिनारमध्ये परीसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, अर्थसहाय्य, अनुदान, उपक्रम इ. गोष्टींची परीपूर्ण माहिती मिळाली. यामध्ये तालुका कृषि अधिकारी व बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.*

*तसेच याप्रसंगी आपल्या फाऊंडेशनच्या वतीने सर्व उपस्थितीतांना सत्यनिष्ठेची शपथ देऊन त्याचे वैयक्तिक आयुष्यात पालन करण्यासाठी प्रोत्साहित केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन एन्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या रायगड टिमने केले, यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.*

*या उपक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन श्री. धनंजय म्हात्रे - नॅशनल चिफ सेक्रेटरी यांचे होते.*

145
3104 views

Comment