logo

राहुरी फॅक्टरी सोमेश्वर वसाहत येथील रहिवासी असलेल्या 55 वर्षीय इसमाचा मृतदेहबंद खोलीत आढळून आला मृत्यूचे कारण समजले नाही

सोमेश्वर वसाहत येथील रहिवासी असलेले व सेटरिंग कारागीर बाबासाहेब बाबुराव चकोर (वय अंदाजे ५५) हे घरात एकटे होते. घराचे दरवाजे बंद व उघडल्या असलेल्या खडकीतून उग्र वास येऊ लागल्याने स्थानिक नागरीकांनी ही माहिती परिसरातील सामाजिक कार्यकर्ते किरण चव्हाण यांना कळविली. त्यानंतर चव्हाण यांनी राहुरी पोलिसांना संपर्क केला. यावेळी आतमध्ये प्रवेश केला असता बॉडी पूर्णपणे फुगलेल्या अवस्थेत होती. सदर व्यक्तीने आत्महत्या केली की हृदयविकार झटका आला हे मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल यांनी दाखल होऊन पंचनामा करत पुढील तपास करीत आहे .

341
305 views