logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*मिठसागरे गावातील एक "लोक कलावंत" हरपला...!*

*मिठसागरे गावातील एक "लोक कलावंत" हरपला...!*


*सिन्नर तालुका ही लोक कलावंतांची भुमी म्हणुन ओळखली जाते... तालुक्यातील अनेक कलावंतांनी आपली पारंपारीक लोक कला जपलेली आहे व जपण्याचा प्रयत्न करत आहेत.... अनेक शाहीर व लोक कलावंत या तालुक्याला आजवर लाभलेले आहे...महाराष्ट्रातील प्रसिद्ध "शाहीर परशराम" हे सुद्धा याच भुमीतील, याच तालुक्यातील वावी गावचे... शाहीर परशराम यांच्या अध्यात्मिक लावण्या आजही महाराष्ट्रात ठिकठिकाणी गायल्या जातात, म्हटल्या जातात... शाहीर परसरामांच्या अध्यात्मिक लावण्या अभ्यासक्रमात सुद्धा आहेत... काही साहीत्तीक व अभ्यासक तर यावर पिएचडी सुद्धा करत आहेत इतके या लावण्यांचे महत्व आहे... "लावणी" म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती तमाशातील लावणी.... परंतु शाहीर परशराम यांनी भविष्याचा वेध घेत त्या काळात सुद्धा लावणीची संकल्पना बदलवली आणि लावणीच्या माध्यमातुन अध्यात्माचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करण्याचे काम केले....!*

*आधुनिक काळात डिजीटलच्या युगात सुद्धा परशरामी लावण्यांचा प्रचार व प्रसार करणारे शाहीर अगदी बोटावर मोजण्याइतकेच राहीले आहेत ... त्यापैकीच एक नामवंत कलाकार "शाहीर दत्तु बाळाजी कासार" (मिठसागरेकर) अर्थात गावात सर्वांच्या परीचयातील... "माऊली तात्या"...!*

*माऊली तात्यांनी आयुष्यभर हलाखीच्या परीस्थीतीत सुद्धा संसाराचा गाडा ओढताना आपल्यातील "कलावंत" आयुष्यभर जिवंत ठेवला...जागरण गोंधळाचे गाणे आणि परसरामी लावण्या म्हणणे हा तात्यांचा आवडता छंद...कलेवर निस्सीम प्रेम करणारा माणुस... तात्यांचे शिक्षण जरी कमी झालेले असले तरी तात्यांचे अनेक कवणं व शाहीरी परसरामी लावण्या तोंडपाठ होत्या.... मिठसागरे गावातील शाहीरी परंपरा जपण्यात तात्यांचा मोलाचा वाटा आहे...!*

*नाशिक जिल्ह्यातील संत शाहीर वरदी परसराम भक्त मंडळातील अनेक लोक कलावंतांसोबत त्यांनी गाणे म्हटली...मिठसागरे गावच्या जुन्या पिढीतील श्री आप्पा कासार, श्री परसराम कासार, श्री भानुदास कासार, कै. सुर्यभान कासार तसेच श्री विठ्ठल बाबा व श्री सयाजी बाबा शिंदेवाडीकर आदी कलाकारांसोबत परसरामी लावण्यांचा वारसा जपला... गायनात टाळ वाजवण्यात त्यांचा चांगला हातखंडा होता तसेच त्यांच्या पहाडी आवाजातही गोडवा होता...!*

*मिठसागरे गावातील जुन्या पिढीतील लोककलावंत "माऊली तात्या" यांना गुरुवार दिनांक ०५/०६/२०२५ रोजी वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली आणि मिठसागरे गावचा हा कलावंत काळाच्या पडद्या आड गेला...शनिवार दि. १४/०६/२०२५ रोजी तात्यांचा दशक्रीया विधी मिठसागरे येथे होणार आहे...*

*श्री संत शाहीर वरदी परसराम महाराज भक्त मंडळ तसेच समस्त मिठसागरेकरांच्यावतीने "माऊली तात्यांना" भावपुर्ण आदरांजली...!*

💐💐💐💐💐💐💐

135
5061 views

Comment