logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*युनिटी रिलिटीज कंपनीचा चौथा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा सुप्रसिद्ध कलाकार माधुरी पवार यांच्या लावणी नृत्यांचा आणि ऋषभ जैन यांच्या संगीतमय कार्यक्रमाचा लुटला आनंद

नागपूर, ता.११
नागपूर जिल्ह्यातील चार तालुक्यात रियल इस्टेट जगात कमी वेळात आपल्या कंपनीचे नावलौकिक करणारे युनिटी रिलिटीज कंपनीचा चौथा वर्धापन दिन राज रॉयल, कामठी रोड, नागपूर येथे (दि.10) जून रोजी कंपनीचे सभासद व ग्राहकांचा उपस्थित साजरा करण्यात आला.
युनिटी रिलिटीज कंपनीचे संचालक धम्मदीप खोब्रागडे व व्यवस्थापकीय संचालक रवी वर्मा यांच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सागा इव्हेंट प्रियंका दंतानी यांनी पार पाडले. यात केरला बँड आकर्षक असून सर्वांचे लक्ष वेधून उपस्थित गर्दीला तालावर नाचायला भाग पाडले होते तर बऱ्याच लोकांनी आपल्या मोबाईल मध्ये बँड त्यांच्या पोशाख यांचे कौतुक करून आढवणी मोबाईल मध्ये सेव्ह केल्या.
तसेच ऋषभ जैन यांनी संगीतमय वातावरण मध्ये अधिक भर पाडली आणि आपल्या आर्केस्ट्रा टीमच्या सहकार्याने एकापेक्षा एक जुने, पुराने, रोमँटिक गाणे गाऊन लोकांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित युवकांना, युवतींना ‌व‌ महिलांना नाचायला वेड लावले. कंपनीचा कार्यक्रम इतक्यातच न थांबता कार्यक्रमाच्या वर्धापनाला चार चांद लावायला महाराष्ट्रातील लावणी सम्राज्ञी सुप्रसिद्ध कलाकार माधुरी पवार यांनी मराठी लावणी सादर करून उपस्थित कंपनीच्या सभासद सदस्यांना, कुटुंबातील सदस्यांना, ग्राहक वर्गांना नाचायला व मनोरंजना कुठलीच उणीव भासू दिली नाही. लोक बेभाव होऊन तिला बघून लावणीच्या आनंद लुटला प्रेषकांनी टाळ्यांचा कडकडाट, वन्स मोर व शिट्ट्यावाजून सभागृह सेरावेरा करून सोडला. माधुरी पवार यांनी भावना व्यक्त केली की, नागपूरकरांनी अपेक्षा पेक्षा जास्त प्रेम दिले त्यांचे कौतुक करून कंपनीचे आभार मानले.
कंपनीचे संचालक धम्मदीप खोब्रागडे व व्यवस्थापकीय संचालक रवी वर्मा यांनी सर्व संचालक मंडळ सदस्यांचा मोठ्या संख्येत कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सभासद व ग्राहकांशी परिचय करून दिला. खोब्रागडे यांनी सांगितले की संचालकांचा व्यवसायिक दृष्टिकोन तसेच त्यांचे ज्ञान आणि अनुभव यांच्या रिअल इस्टेट कंपनीला फायदा होत असल्याचे सांगितले. यावेळी कंपनीचे क्राऊन मॅनेजर किशोर तांडेकर, रॉयल मॅनेजर नंदू कठाने, रॉयल मॅनेजर शुभम पहाडे व आई-वडील कुटुंबासोबत केक कापून चौथा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी संचालक मंडळानी गेल्या चार वर्षात उत्तम कामगिरी पार पाडणारे कंपनीचे टॉप लीडर, स्टार लीडर, थर्टी सीएसएल ग्रुपच्या सदस्यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तर कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा आभार मानून त्यांच्या कार्याची स्तुती करून त्यांना स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एजाज खान यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला शिवराम कनोजे, राजेश शेंडे , मनीष बन्दी, आकाश दरवाडे, सतीश राय,राजेंद्र नंदगवळी, इरफान खान, निलेश कुशवाह, नरेंद्र उपरकर, शांतनु जोशी, अर्जुन कनौजे,संजय गौतम, तुषार सोनवणे, साचिन निनावे आधी उपस्थित होते तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गौरव जानबंधू, अभय पंतवणे, अमन जांभुळकर, अक्षय शेंडे, रजत सावरकर, ओम कोटांगळे, तन्मय मिलिमले, यादव खडसे, हर्षल शंभरकर, कोविड मारबते, रुशिल मिलिमले, किशोर बोरकर, आकाश घुगल, नजीश अन्सारी,धोंबाजी नेहारे, भास्कर मडेकर, शैलेंद्र बनसोद दीक्षा नागदवाने मॅडम, शुभांगी बगतकर मॅडम, आदींनी परिश्रम घेऊन सहकार्य केले.

139
2214 views

Comment