logo

प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची - आमदार बबनराव लोणीकर. परतूर (प्रतिनिधी) :- भाऊसाहेब पाटील मुके -

परतूर येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकारणी सोबतच विविध प्रकार सेलची घोषणा.
====================
वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आमदार लोणीकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये पक्षप्रवेश
====================
पक्ष संघटनेत विविध पदावर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना, आमदार लोणीकर, आमदार कुचे, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र
===================
जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कूचे च्या सत्काराच्या निमित्ताने आमदार लोणीकरांनी, फुंकले आगामी नगरपालिका, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचे रणसिंग
====================
प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची -
आमदार बबनराव लोणीकर
====================
येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगर पालिका नगरपालिकेमध्ये भाजपाचा झेंडा फडकवणार.
आमदार लोणीकरांचे प्रतिपादन
====================
भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, पक्ष संघटनेमध्ये काम करून स्वतःला सिद्ध करावे.
आमदार बबनराव लोणीकर
====================
येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज रहा.
जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे
====================
जन सामान्यांच्या कामामधून, येणाऱ्या निवडणुका जिंकून दाखवू.
आमदार नारायण कुचे
====================
परतूर नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवणारच.
भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर
====================

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांचे विचार तळागाळातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची असून, सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे मोदीजींचे ब्रीद ध्यानात घेऊन कार्यकर्त्यांसोबत समरस होत संघटना वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
ते परतुर येथे भाजपा च्या तालुका कार्यकारणी व विविध आघाड्या प्रकोष्ट च्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र वाटप समारंभ तसेच नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आ नारायण कुचे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते
यावेळी व्यासपीठावर, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, परतूर मंडळाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपत टकले बद्रिनारायन ढवळे अशोकराव बरकुले महिला आघाडी तालुकाध्यक्ष छायाताई घोरबांड भाजपा शहराध्यक्ष प्रवीण सतोनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती
दरम्यान जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे यांच्या सत्काराच्या निमित्ताने आमदार बबनराव लोणीकर यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेचे रणसिंग फुंकले असल्याची चर्चा जोरदारपणे चर्चिली जात होती
पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की , आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती जालना महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना जिद्दीने उतरायचे असून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ता मिळवायचे असल्याचे यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बोलताना त्यांनी सांगितले पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की
पक्ष संघटनेत काम करत असताना तुझा भाऊ न बाळगता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून थेट तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहोचवण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे आमदार लोणीकर म्हणाली की, भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाच्या माध्यमातून विविध पदावर काम करण्याची संधी दिली जाते व त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्हावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली
पुढे बोलताना ते म्हणाले की केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार यांच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जात असून या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले परम कर्तव्य असून हे करत असतानाच संघटनेत नवयुवक, युवतींना संघटनेत प्रवाहित करण्याची जबाबदारी ही आपली असल्याचे त्यांनी नमूद केले
यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे म्हणाले की, पक्ष संघटनेचे काम करत असताना स्वतःला झोकून देत पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून गावागावा पर्यंत संघटना पोहोचवत येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वच आघाड्यांवर भारतीय जनता पार्टीला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत रहावे, या माध्यमातून वाडी वस्ती झोपडपट्टीवरील कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी जोडण्यासाठी पोषक वातावरण तयार करून या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांची असल्याचे सांगितले
यावेळी भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर म्हणाले की , पदाधिकारी म्हणून आपली जबाबदारी चोखपणे निभावताना ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांची जाळे निर्माण करतानाच येणारी परतूर नगरपालिकेचे निवडणूक आपण जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला
आपले सर्वांचे नेते आमदार बबनराव लोणीकर सक्षम असून, येणाऱ्या अडचणीवर मात करत आपल्याला प्रत्येकाला संघटनेला बळकटी देण्याचे काम करावयाचे असल्याचे त्यांनी नमूद केले
===================
*वंचित व शिवसेनेमधून अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश*
====================
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही लोक रस्ता चुकले होते त्यांनी वंचित बहुजन आघाडी शिवसेने मध्ये काम केले मात्र खरा न्याय भारतीय जनता पक्ष देऊ शकतो आमदार बबनराव लोणीकर घेऊ शकतात हे ध्यानात येताच अनेकांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
यामध्ये रमेश राव थोरात, अर्जुनराव थोरात महादेव वाघमारे सावता काळे गजानन चवडे,( युवा सेना प्रमुख) सावता काळे शहाजी सुरंग नामदेव गोरे दत्ता कोल्हे संपत बंनगावडे सय्यद असलम राजू शेख शेषराव अवचार शिवाजीराव आवचार कैलास आवचार वैजनाथ नागरे सुभाष नागरे गजानन मुळे अनिल अवचार इंद्ऱ अवचार विलास अवचार काळूराम मस्के योगेश सुरोशे सुनील आवचार रवी अवचार कुणाला विचार ओंकार आवचार अर्जुन सुरोशे भाऊसाहेब नागरे रामजी सोळंके, विश्वंभर काळे अर्जुन काळे शुभम काळे नितीन काळे सिद्धेश्वर काळे प्रल्हाद चवडे , कारभारी घुले श्याम सुराशे राजेश माळवे गोविंद मोहिते योगेश घुले रघुनाथ काळे ब्रह्मदेव घुले हरी ओम चवडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
===================
यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे यांचा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी कार्यकारणी, भाजप कार्यकारणी, ओबीसी मोर्चा कार्यकारणी, यासह सर्व प्रकोष्ट सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुचे भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली
या कार्यक्रमाला भगवानराव मोरे दया काटे पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले शिवाजी पाईकराव प्रदीप ढवळे तुकाराम सोळंके भाजपा माणिकराव वाघमारे, परमेश्वरा आकात बंडू मानवतकर गजानन लोणीकर,बंडू मानवतकर सिद्धेश्वर केकान, मधुकर मोरे , अमोल पवार, ज्ञानेश्वर सोळंके, गजानन लिपणे संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे, दिनेश होलानी, ओम प्रकाश मोर, अमोल अग्रवाल, अमर बगडिया, नरेश कांबळे, सुरेश काळे, भगवान आरडे, मधुकर मोरे, बाबाराव थोरात बबलू सातपुते आसिफ कच्ची नसरुल्ला काकड श्री गांजाळे सुरेश जगताप, विजय यादव गोपी ठाकूर सनी तनपुरे, मेरा खतीब विश्वंभर शेळके हनुमान चिखले अशोक भांडवले कैलास यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांची उपस्थिती होती

11
1850 views