logo

जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय लिपिक संघटना शाखा जिल्हा बीड खुल्लर समितीच्या वेतन त्रूटी अहवालावर जि.प.कर्मचा-यानी जाहीर निषेध नोंदवून निर्णयाची होळी केली

खुल्लर समितीच्या वेतन त्रूटी अहवालावर जि.प.कर्मचा-यानी जाहीर निषेध नोंदवून निर्णयाची होळी केली
जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय लिपिक संघटना शाखा जिल्हा बीड :
लातूर प्रतिनिधी :- जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय लिपिक संवर्ग वेतन त्रूटी व जुनी पेन्शन संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक डहाळे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद बीड च्या सभागृहात जिल्हास्तरीय बैठकीत मुकेश खुल्लर समितीने दिलेल्या अहवालावर सविस्तर चर्चा करुन सर्व संघटनांनी लिपीक वर्गीय संवर्गातील कर्मचा-यावर व लेखा संवर्गातील कर्मचा-यावर चौथ्या आयोगापासून वेतनावर झालेल्या अन्यायाबाबत लिपिक वर्गीय संघटना व म.रा.जि.प.लेखा कर्मचारी संघटना आणी म.रा.जि.प.युनियन यांनी मागणी केलेली असतानाही खुल्लर समितीने संघटनेच्या मागणीला विचारात न घेता लिपीक वर्गीय व लेखा संवर्गातील कर्मचा-या विरुध्द अहवाल देवून वेतन त्रूटीमध्ये तफावत निर्माण करुन अवमान केलेला आहे. दि.2.6.25 ला शासनाकडून निर्णय निर्गमित केल्यामुळे जि.प.कर्मचा-यात असंतोष निर्माण झालेला आहे.याकरिता जिल्हा परिषद अंतर्गत सर्व राज्य स्तरीय संघटना एकत्रित येवून कृतीसमिती करुन दि.22.6.25 नंतर लेखणी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे.आज दि.13.6.25 रोजी संघटनेच्या बैठकीनंतर जि.प.बीडच्या आवारात जि.प.समोर संघटनेच्या पदाधिका-यांनी व कर्मचा-यानी दि 2.6.25 च्या शासन निर्णयाची होळी करुन निषेध नोंदविला व याबाबत शासनास निवेदन देण्याचे ठरले.तसेच बैठक संपल्यानंतर अहमदाबादहून लंडनला जाणा-या विमानाचा अपघात झाल्यामुळे मरण पावलेल्या सर्व नागरिकांसाठी दोन मिनट स्तब्ध उभा राहून त्यांचे आतम्यास शांती लाभावी करिता श्रदांजली वाहण्यात आली.
लिपीक वर्गीय संघटनेच्या बैठकीस उपस्थित राज्य अध्यक्ष अशोक डहाळे, म. रा. जि. प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष शेख वजीर, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे, म.रा. जि.प. युनियनचे अनंत खेडकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रवीण येवले,महादेव सोनवळकर ,वरिष्ठ सहाय्यक लेखा गोरे,संजय डावकर,विनायक आणेराव, जाधव,राहूल जोशी,राहूल गुंजेगावकर,लक्ष्मीकांत देशपांडे,गणेश खाडे,खदीर काद्री,कैलास तांगडे, कृष्णा मुंडे,सौंदर्य,दिलीप फुलेवाड, विलास मुंडे,शिवाजी राठोड,किशोर जाधव,चंद्रकांत सरवदे,डि.जी.जाधव,विवेक फुंदे,श्रीराम सानप,विनोद कांडेकर,विनोद साळवे,संतोष सिरसट,मकरध्वज सावंत,पडोळे,भगवान वाघमारे,जगवाल,सागर बारवकर व.स.ले,विजय गायकवाड,बंड,येनकुळे, हिंगे सर्व महिला कर्मचारी सुनिता सुर्यवंशी,नंदा काळे,अलकनंदा गवते,लक्ष्मीकांत कवडे, स्वाती आम्ले,अयोध्या तांदुळ,किस्कींदा डोईफोडे,सुरेखा विभुते,माजी मॅडम,देवगुडे मॅडम,अंबिका साळुंके,माया गायकवाड,सुनीता गर्जे,कावळे मॅडम,मोटेगांवकर मॅडम,माधवी पुरी,स्मिता मुदीराज, ईतर सर्व विभागातील कर्मचा-यानी बैठकीत सहभाग नोंदवून बैठक उत्साहात संपन्न झाली.

253
7235 views