logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मी जून महिन्यामधील राशन अजूनही वाटत नाही

जूनचेच धान्य वाटपाला सुरूवात नाही
१६ जणांना नोटीसा

नांदेड, दि. १६ ः पावसाळा व महापुरासारख्या आपत्तीजनक परिस्थितीत राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे, म्हणजे ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच दोन ते तीन टप्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, दुकानदारांकडून अद्याप जूनचेच धान्य वितरीत केले गेले नाही. जुलै व आॅगस्टचे कधी वाटप करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. १५ जून पर्यंत वाटप करणे अपेक्षित होते. मात्र, ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली चौगुले व तालुका निरीक्षक रवींद्र राठोड यांच्यासह पथकाने मागील दोन दिवसांपासून अचानक रेशन दुकानांना भेटी दिल्या. यात नांदेड शहरातील बंद राहणाऱ्या १६ दुकानदारांना नोटीसा बजावल्या आहेत.

नांदेड शहरात एकूण २३० स्वस्त धान्याची दुकाने आहेत. अनेक रेशन दुकानांवर फलक नाहीत, ठरवून दिलेल्या वेळेत दुकाने बंद तर, महिन्यातून दोन ते तीन दिवसच उघडणे, मोबाईलवर संदेश न पाठवणे यासह नागरिकांना धान्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा पुरवठा विभागातकडे प्राप्त झाल्या आहेत. यासोबतच जूनमध्ये एकत्रित आणि देण्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागाने अचानक दुकानांना भेटी देण्याची मोहीम सुरू केली आहे. दुकानदारांना धान्य व पॉस मशीन वर डाटा उपलब्ध करून देवून ही धान्य वाटप केले नाही. शासनाच्या सूचनांचे गांभीर्याने पालन केले जात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन दिवसात १६ स्वस्त धान्य दुकानदारांना नोटीस बजावण्यात आले आहेत. सात दिवसात खुलासा न दिल्यास दुकानदारांचे डिपॉझिट जप्त केले जाणार आहे. या कारवाईने रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

या राशन दुकानांवर कारवाई

इतवारा रोडवरील योगेश कमलाकर बारडकर(दुकान क्र. ८५), मधुकर दिगंबर बच्चेवार(८२), हमर्दद स्टोअर्स अँड कंपनी(४३), जंगमवाडी मधील ताहेर खान शमशेर खान(३७), किल्ला रोडवरील हाजेरा बेगम मोहम्मद युसुफ(५०) , जुनागंज येथील नसरीन बानो युसुफ खान(४६), पिवळी गिरणी आशीर्वाद नगर भागातील संजय मा. मजुर स. संस्था(९३), मंढई टेकडी येथील सबीया बेगम जहीरोद्दीन (५२) व अन्य दुकानदारांना नोटीस बजावली आहे, असे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. व

138
27039 views

Comment