logo

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता गुहागर जि रत्नागिरी या प्रशालेत माजी जि. प. अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 16 जून 2025 रोजी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या प्रसंगी तळवली गटविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. विनायक मुळे साहेब व त्यांचे इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला दोन वह्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या स्वागत मुख्याध्यापक श्री एम ए थरकार सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. विनायक मुळे साहेब यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने श्री. विक्रांत जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना उपयुक्त शालोपयोगी वह्या वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल जड्याळ सर यांनी केले तर आभार जेष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर यांनी मानले.

16
1377 views