logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पत्रकारांसाठी घरकुल योजना राबवा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन; अनेक मान्यवर पत्रकारांची उपस्थिती

पत्रकारांसाठी घरकुल योजना राबवा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन; अनेक मान्यवर पत्रकारांची उपस्थिती

सोलापूर (प्रतिनिधी) - पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे त्यांना स्वतःची मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत कोरोना सारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार चे कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी आहे पत्रकारानी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
*पत्रकारांच्या घरकुल योजने संदर्भात पत्रकार सुरक्षा समितीचे निवेदन राज्य सरकारकडे पाठवून पत्रकारांच्या भावना राज्यसरकार ला कळवणार उपजिल्हाधिकारी यांचे पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाला ठोस आश्वासन*
*सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःची मालकीची घरे नसणाऱ्या पत्रकारांच्या घरकुल संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश यशवंत पवार यांनी यावेळी पत्रकारांना दिली आहे*
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर उपाध्यक्ष अमर पवार सोलापूर शहर अध्यक्ष अन्सर तांबोळी (बी एस ) शहर अध्यक्ष( महिला विभाग) रक्षंदा स्वामी शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिडगिद्दी समन्वयक लक्ष्मण सुरवसे संघटक कबीर तांडूरे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद अजमेर शेख योगेश स्वामी अशोक खेडगीकर कल्याणी कुंभार बेलीफ इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

139
4269 views

Comment