
रुग्णांनावाहिका बाहेर गेल्या चे सांगताचसुरक्षा रक्षकाला मारहाण , वसमत येथील प्रकरण , एका तरुण विरुद्ध वसमत शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला
वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका बाहेर गेल्याची सांगताच रुग्णाच्या सोबत आलेल्या् तरुणाने सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत पोलिस ठाण्यात एका तरुणा विरुध्द रविवारी ता. २५ अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रतिक मोरे हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. नेहमी प्रमाणे शनिवारी ता. २४ ते कर्तव्यावर आले होते. रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास सागर बबिलवार हा तेथे आला. त्याने त्याच्या नातेवाईकासाठी उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक प्रतिक यांनी सागर यास रुग्णालयाची रुग्णवाहिका बाहेर गेल्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध नाही त्यामुळे तुम्ही १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलवावी असे सांगितले. यावरून सागर याने प्रतिक यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर अचानक मारहाण सुरु केली. या प्रकारामुळे प्रतिक घाबरून गेले. मारहाण केल्यानंतर सागर त्या ठिकाणावरून निघून गेला.
दरम्यान, सदर प्रकार प्रतिक यांनी वरिष्ठांच्या कानावर टाकला. त्यानंतर त्यांनी या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे सुचविले. त्यावरून प्रतिक यांनी रविवारी ता. २५ वसमत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सागर बबिलवार याच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख हकीम, बालाजी मिरासे पुढील तपास करीत आहेत.