logo

30 कामगारांना कामावरुन केले कमी उमरखेड न. प. चा सफाई कामगारांवर अन्याय : आंदोलनाचा ईशारा

उमरखेड :- उमरखेड नगरपरिषद

मध्ये दहा वर्षापासून सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या 30 जणांना कुठलेही कारण नसतांना मागील तीन महिन्यापासून कामावरून कमी करून बाहेरगावच्या लोकांची त्यांच्या जागी भरती केली नगर परिषदेने कमी केलेल्या सर्व सफाई कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशांत ससाणे यांच्यासह पिडीत कामगारांनी न प मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

मागील दहा वर्षापासून सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या 30 जणांना मागील तीन महिन्यापासून तडका फडकी कामावरून कमी केले व त्यांच्या जागी बाहेरगावच्या लोकांची कामावर भरती केली उमरखेड नगर परिषदेने केलेल्या या अन्यायामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली उमरखेड नगर परिषदेने कामावरून कमी केलेल्या 30 जणांना पूर्ववत कामावर घ्यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशांत ससाने, अविनाश गालफाडे, गणेश नरवाडे, अनिल गालफाडे, गोकुळ जोहरेवाड, गणेश इंगोले, श्याम गायकवाड, महेश पवार, सुमित चावरे यांच्यासह तीस पीडित सफाई कामगारांनी उमरखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे
सदर निर्णय ठेकेदाराचा - महेश कुमार जामनोर

सदर सफाई कामगार हे कंत्राटदाराच्या माध्यमातून कामावर होते. त्यांना संबंधित कंत्राटदाराने कामावरून कमी केल्याची माहिती प्राप्त झाली असून संबंधित सफाई ठेकेदाराने त्यांना कमी केले असावे हा त्या ठेकेदाराचा विषय असून नगर परिषदेचा या प्रकरणाची कुठलाही संबंध नाही.

105
281 views