मुंबईत पावसाचा जोर कायम; अतिजोरदार पावसाची शक्यता
प्रतिनिधी. अनिकेत मेस्त्री
मुंबईसह कोकण परिसरात पावसाचा जोर कायम असून, पुढील २४ तासांत काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहर आणि उपनगरांत ढगाळ हवामान राहणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोकण, मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगड परिसरात सध्या आर्द्रतेच्या जास्त प्रमाणामुळे ढगांची घनता वाढलेली आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संरेखित प्रभाव, तसेच 700/600 hPa पातळीवरील ट्रफच्या कारणास्तव पावसाचे प्रमाण वाढत आहे. सध्या मान्सूनसदृश हवामान प्रणाली भारताच्या उत्तर भागात सक्रिय होत असून, यामुळे हवामानात बदल होत आहेत.