logo

आकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 निमित्य संयोग व योग संगम कार्यक्रम शिरूर ताजबंद.

आकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 निमित्य संयोग व योग संगम कार्यक्रम शिरूर ताजबंद, सी. सी. आर. वाय. एन.आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने व आशा योग नॅचरोपॅथी आणि पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिरूर ताजबंद आयोजित, भव्य योग शिबिर स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मैदानात दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत होणार आहे या शिबिराचे उद्घाटन मा. ना. श्री बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात कॉमन योगा प्रोटोकॉल सह विशेष योग सत्र घेण्यात येईल तसेच विविध विषयावर व्याख्याने चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहेत.या शिबिरात जेष्ठ योग प्रशिक्षक योगरत्न डॉ. मधुसूदन चेरेकर,योगाचार्य श्री शिवमुर्ती भातांब्रे सह 15 योग शिक्षक, डॉक्टर सेवा देणार आहेत अशी माहिती डॉ. लक्ष्मीकांत वाघमारे यांनी दिली.

73
1575 views