logo

स्व. प्रशांत पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भक्तिमय आदरांजली

दिनेश पाटील यांच्यावतीने पुण्यस्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

रायगड : राज भंडारी

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस तसेच पनवेल उरण महाविकास आघाडीचे प्रमुख घटक दिवंगत प्रशांत पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ जे. एन. पी. टी. तील त्यांचे सहकारी दिनेश पाटील यांच्यावतीने जे. एन. पी. टी. टाऊनशिप येथील सभागृहात ओमकार सांस्कृतिक भजन मंडळ उरण आणि हनुमान प्रासादिक भजन मंडळ जांभूळपाडा उरण यांच्या भजनाने भक्तिमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उरण, पनवेलसह परिसरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, व शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते प्रशांत पाटील यांचे गुरुवारी २० जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५६ व्या वर्षी नवी मुंबईतील आपोलो रुग्णालयात दुःखद निधन झाले. कोकण पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ १८ जून २०२४ रोजी पनवेल येथे पदवीधर मतदार आणि कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहून उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शनही केले होते. १९ जून २०२४ रोजी रात्री त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे, रात्री उशिरा त्यांना नवी मुंबईतील आपोलो रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली व हृदयविकाराच्या झटक्याने २० जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. उरणचे डॅशिंग नेतृत्व म्हणून प्रशांत पाटील यांचा बोलबाला होता.

आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने त्यांचे जवळचे सहकारी दिनेश पाटील यांनी त्यांच्या आठवणी जाग्या ठेवण्याच्या उद्देशाने जे. एन. पी. टी. टाऊनशिप येथील सभागृहात ओमकार सांस्कृतीक भजन मंडळ उरण (पुर्वविभाग), हनुमान प्रसादीक भजन मंडळ जांभूळपाडाचे अध्यक्ष रायगड भूषण डी.आर.ठाकूर धुतूम, उपाध्यक्ष अशोक पाटील जांभूळपाडा, गायक विलासबुवा मढवी, राजुबूवा मढवी, गुरुनाथ पाटील यांच्या भक्तिमय भजनाने भक्तिमय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उरण, पनवेल, नवीमुंबईसह परिसरातील अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थित राहून स्व. प्रशांत पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी स्व. प्रशांत भाऊ पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, वादळवारा वृत्तसमूहाचे संपादक विजय कडू, ॲड. विजय पाटील - अध्यक्ष उरण बार असोसिएशन, ॲड. सुदिन पाटील, भाजपचे महादेव बंडा पाटील, सुधाकर पाटील उ.सा.संस्था, जी.यु. कोल्हे शेकाप, जयवंत पाटील काँग्रेस, जेएनपीटीचे सुनिल, उदयोगपती मनोज पडते, विजय भोईर, के. एल. कोळी, संतोष पाटील, एल.जी. म्हात्रे भाजप, नरसू पाटील, सौ. सीमा घरत शिवसेना, सुभाष तांडेल शिवसेना, संतोष पवार शिक्षक संघटना, गोपाळ पाटील अध्यक्ष, उरण उत्कर्ष समिती तसेच आगरी समाज, रवी पाटील जे. एन. पी. टी. विश्वस्त, शैलेश ठाकूर जसखार सामाजिक संस्था, रमाकांत म्हात्रे माजी सरपंच, जेएनपीटी मेडीकल अधिकारी डॉ. यतीश पाटील, अजित पवार गट राष्ट्रवादी भार्गव पाटील, हास्यप्रबोधनकर संजीवन म्हात्रे, देवानंद पवार SC/ST अध्यक्ष JNPA, विश्वास म्हात्रे माजी सभापती, पुखराज सुतार, शरद पवार गट राष्ट्रवादी, मनोज ठाकूर कर्वे राष्ट्रवादी कॉ., दिपक भोईर शिवसेना (शिंदेगट), जयवंत ढवळे शिवसेना, सुलेमान शेख राष्ट्रवादी कॉ., समीर सुर्वे राष्ट्रवादी कॉ., विकांत अध्यक्ष शिवसेना शिंदेगट, दिपक ठाकूर-JNPA चिफ मॅनेजर, संजय तारे JNPA अधिकारी, परिक्षीत ठाकूर -अध्यक्ष उरण तालुका राष्ट्रवादी कॉ, मनोज भगत राष्ट्रवादी कॉ. माजी उरण तालुका अध्यक्ष, भूषण ठाकूर राष्ट्रवादी कॉ. दिपक माळी राष्ट्रवादी कॉ. निलेश्वर भगत राष्ट्रवादी कॉ. तुषार ठाकूर राष्ट्रवादी कॉ., निलेश पाटील राष्ट्रवादी कॉ. संजय पवार राष्ट्रवादी कॉ., बळीराम ठाकूर सरपंच घारापूरी, महेंद्र पाटील -माजी सरप्रमुख शिवसेना, पंडितशेठ घरत भाजप, संदिप कांबळी- शिवसेना, अमोल ठक्कर प्राचार्य फुडे कॉलेज, सुनील घरत-राष्ट्रवादी कॉ. नेते, मा. नगराध्यक्ष पनवेल, दशरथ गायकर शेकाप, यशवंत ठाकूर -शेकाप, दिनेश पाटील BPCL कामगार, कैलास म्हात्रे उद्योगपती, मनोहर ठाकूर भेंडखळ, जेएनपीए कामगार अरुण कडू, नंदू पाटील, हेमंत मेकडे, यु.बी.सिंग, संदिप कांबळी, सौ. वंदना ठाकूर, प्रल्हाद तांडेल, प्रल्हाद श्याम म्हात्रे, खुशाल घरत, मोहन घरत, संदिप घरत, प्रशांत घरत, श्रीमती सुषमा म्हात्रे, सौ. जागृती धुमाळ, उत्तम कडवे, अनिल पाटील, विकास नाईक, उद्योगपती, पी.टी. म्हात्रे शिवसेना, एल. बी. पाटील, भोपी, आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दिनेश पाटील यांनी सांगितले की, आमचे प्रशांत भाऊ हे भावनिक तर होतेच पण देवावर अपार श्रद्धा ठेवणारे भाविक पण होते. ते आमच्यातून गेलेत हे दुःख आम्हाला सहन होणारं नाहीच आहॆ. मुळात ते आमच्यातून गेलेत हेच आम्ही मान्य करू शकत नाही. पण त्यांची शैली, त्यांची श्रद्धा ही कायम जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत राहणार आहोत आणि म्हणूनच आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ भजनाचे कार्यक्रम ठेवून त्यांना भक्तिमय श्रद्धांजली अर्पण करण्याचा त्यांचा एक जवळचा सहकारी म्हणून प्रयत्न केला असल्याचं त्यांनी भावनिक होऊन सांगितलं.

13
454 views