logo

भगूर येथे जागतिक योग दिन साजरा.

भगूर: 21 जून रोजी जागतिक योग दिना निमित्त इंटरनॅशनल नचुरोपती ऑर्गनायझेशन (INO) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार चंद्रगिरी योग व निसर्गोपचार केंद्र तसेच एज्यूट्रिक्स क्लासेस या संस्थे मार्फत योग संगम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
पावसामुळे सावरकरवाडा भगूर जवळ असलेल्या एज्यूट्रिक्स ट्युशन क्लासेसच्या जागेत योग संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तरी कार्यक्रमात अनेक विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला. प्रशिक्षित योग व निसर्गीचार कार्यकर्त्यांनी योगाबाबत माहिती दिली. आणि उपस्थित लोकांना योग आणि प्राणायाम करण्या बाबत मार्गदर्शन केले.
प्रसंगी चंद्रगिरी योग व निसर्गोपचार केंद्राचे तसेच एज्यूट्रिक्स क्लासेस संस्थेचे पदाधिकारी तसेच अनेक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

149
3755 views