
सिडको कार्यालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दत्तू ठाकूर यांनी स्पष्टच सांगितले
सिडको कार्यालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दत्तू ठाकूर यांनी स्पष्टच सांगितले
सिडकोविरोधात १९८४ पासून दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढतोय : ठाकूर
सिडको अधिकाऱ्यांना हप्ता देण्यास मी तयार होतो, पण धनादेशाने
उरण : राज भंडारी
उरण तालुक्यातील धुतुम येथील शेतकऱ्यांच्या जागेचा मोबदला न देता त्याच्या ताबेकबज्यातील जमीन बळकावण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांना हाताशी धरून काहीजण नाहक त्रास दिल्याचा आरोप करीत धुतुम येथील शेतकरी दत्तू भिवा ठाकूर या ८३ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने सिडको कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास विशप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर बेलापूर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्यांची प्रकृती स्थिरावली असल्यामुळे शुक्रवारी त्यांना रुग्णालय प्रशासनाने घरी सोडले. यावेळी सर्वप्रथम त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त होण्याचा निर्णय घेतला आणि सिडको प्रशासन कशा पद्धतीने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे, याबद्दल माहिती दिली.
शेतकरी दत्तू ठाकूर यांची जमीन सिडकोने संपादित केली. मात्र अद्याप मोबदला देण्यात आला नाही. तसेच सिडकोकडून १२.५% टक्के विकसित भूखंड मिळाला नाही. यासाठी शासनाकडून त्यांना उदरनिर्वाहसाठी ४ एकर ९ गुंठे भूखंड देण्यात आला. या भूखंडावर दत्तू ठाकूर यांनी पार्किंग व्यवसाय सुरु केला, मात्र सिडको अधिकारी भरत ठाकूर यांनी सदर व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी दत्तू ठाकूर यांच्याकडे प्रति महिना ५० हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा याठिकाणी आम्ही दुसऱ्याला प्लॉट हस्तांतरित करण्याची धमकी देऊन सदर भूखंडावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे आपल्याला आत्महत्येचा पर्याय निवडावा लागला असल्याची माहिती दत्तू भिवा ठाकूर यांनी प्रसिद्धीमाध्यमांजवळ बोलताना सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सन १९८४ सालापासून दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडकोविरोधात आम्ही लढत आलो आहोत. एखाद्याला चुकीच्या मार्गाने पैसे देणे किंवा घेणे हे आमच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मला मिळालेल्या जमिनीवर मला व्यवसाय करण्यासाठी सिडकोचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी भरत ठाकूर हे ५० हजार रुपये प्रति महिना मागणी करीत होते. यावर मी त्यांना पैसे देईन पण धनादेश द्वारे देईन, असे सांगितल्यामुळे त्यांनी सदर भूखंडावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करून मला आत्महत्येस प्रवृत्त केलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सदर भूखंड हा जिल्हाधिकारी रायगड यांनी उदरनिर्वाहसाठी दिला होता, तो भूखंड देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हिसकावून घेत एलएनटी कंपनीला दिला असल्याचे सांगून या भूखंडावरून त्यांना हुसकावून लावले. मात्र प्रत्यक्षात याठिकाणी धुतुम येथीलच भरत ठाकूर यांच्या वसुली एजंटला पार्किंगचा व्यवसाय करण्यासाठी सदर भूखंड देण्यात आला. सदरबाबत आपल्यावर अन्याय होत असून आपल्याला न्याय न मिळाल्यास आपण आत्महत्या करू शकत असल्याचा इशारा शेतकरी दत्तू ठाकूर यांनी उरण पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये दिला. मात्र काही धनदांडग्यांच्या आणि सिडको अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे आमच्यावर पोलीस प्रशासन देखील अन्याय करीत असल्याचा आरोप दत्तू ठाकूर यांनी केला.
*चौकट*
दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दत्तू ठाकूर यांना प्रसिद्धी माध्यमांशी काही सांगायचे असल्यामुळे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना निमंत्रित केले. यावेळी येथील सुरक्षा रक्षकांनी तसेच रुग्णालय व्यवस्थापनाने पत्रकारांनी रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन काय भेटायचं ते भेटा, असा पवित्रा घेतला. तसेच दुपारी १२ वाजता मिळणारा डिस्चार्ज जाणीवपूर्वक सायंकाळी दिला गेला. पुन्हा दत्तू ठाकूर हे सिडको कार्यालयात तर येणार नाहीत ना ? अशी भीती तर सिडकोच्या अधिकाऱ्यांना वाटली नसेल ना ? सिडको प्रशासनाने रुग्णालय प्रशासनावर काही दबाव तर आणला नव्हता ना ? असा प्रश्न दत्तू ठाकूर यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला. जमीन बळकावण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांना हाताशी धरून काहीजण नाहक त्रास दिल्याचा आरोप करीत धुतुम येथील शेतकरी दत्तू भिवा ठाकूर या ८३ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने सिडको कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास विशप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर बेलापूर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्यांची प्रकृती स्थिरावली असल्यामुळे शुक्रवारी त्यांना रुग्णालय प्रशासनाने घरी सोडले. यावेळी सर्वप्रथम त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त होण्याचा निर्णय घेतला आणि सिडको प्रशासन कशा पद्धतीने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे, याबद्दल माहिती दिली.
शेतकरी दत्तू ठाकूर यांची जमीन सिडकोने संपादित केली. मात्र अद्याप मोबदला देण्यात आला नाही. तसेच सिडकोकडून १२.५% टक्के विकसित भूखंड मिळाला नाही. यासाठी शासनाकडून त्यांना उदरनिर्वाहसाठी ४ एकर ९ गुंठे भूखंड देण्यात आला. या भूखंडावर दत्तू ठाकूर यांनी पार्किंग व्यवसाय सुरु केला, मात्र सिडको अधिकारी भरत ठाकूर यांनी सदर व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी दत्तू ठाकूर यांच्याकडे प्रति महिना ५० हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा याठिकाणी आम्ही दुसऱ्याला प्लॉट हस्तांतरित करण्याची धमकी देऊन सदर भूखंडावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे आपल्याला आत्महत्येचा पर्याय निवडावा लागला असल्याची माहिती दत्तू भिवा ठाकूर यांनी प्रसिद्धीमाध्यमांजवळ बोलताना सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सन १९८४ सालापासून दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडकोविरोधात आम्ही लढत आलो आहोत. एखाद्याला चुकीच्या मार्गाने पैसे देणे किंवा घेणे हे आमच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मला मिळालेल्या जमिनीवर मला व्यवसाय करण्यासाठी सिडकोचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी भरत ठाकूर हे ५० हजार रुपये प्रति महिना मागणी करीत होते. यावर मी त्यांना पैसे देईन पण धनादेश द्वारे देईन, असे सांगितल्यामुळे त्यांनी सदर भूखंडावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करून मला आत्महत्येस प्रवृत्त केलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सदर भूखंड हा जिल्हाधिकारी रायगड यांनी उदरनिर्वाहसाठी दिला होता, तो भूखंड देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हिसकावून घेत एलएनटी कंपनीला दिला असल्याचे सांगून या भूखंडावरून त्यांना हुसकावून लावले. मात्र प्रत्यक्षात याठिकाणी धुतुम येथीलच भरत ठाकूर यांच्या वसुली एजंटला पार्किंगचा व्यवसाय करण्यासाठी सदर भूखंड देण्यात आला. सदरबाबत आपल्यावर अन्याय होत असून आपल्याला न्याय न मिळाल्यास आपण आत्महत्या करू शकत असल्याचा इशारा शेतकरी दत्तू ठाकूर यांनी उरण पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये दिला. मात्र काही धनदांडग्यांच्या आणि सिडको अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे आमच्यावर पोलीस प्रशासन देखील अन्याय करीत असल्याचा आरोप दत्तू ठाकूर यांनी केला.
*चौकट*
दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दत्तू ठाकूर यांना प्रसिद्धी माध्यमांशी काही सांगायचे असल्यामुळे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना निमंत्रित केले. यावेळी येथील सुरक्षा रक्षकांनी तसेच रुग्णालय व्यवस्थापनाने पत्रकारांनी रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन काय भेटायचं ते भेटा, असा पवित्रा घेतला. तसेच दुपारी १२ वाजता मिळणारा डिस्चार्ज जाणीवपूर्वक सायंकाळी दिला गेला. पुन्हा दत्तू ठाकूर हे सिडको कार्यालयात तर येणार नाहीत ना ? अशी भीती तर सिडकोच्या अधिकाऱ्यांना वाटली नसेल ना ? सिडको प्रशासनाने रुग्णालय प्रशासनावर काही दबाव तर आणला नव्हता ना ? असा प्रश्न दत्तू ठाकूर यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला.