कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, तर पुणे घाट परिसरात पुढील 24 तासाकरिता ऑरेंज अलर्ट.
प्रतिनिधी. अनिकेत मेस्त्री
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. राज्यात मागील 24 तासांमध्ये (20 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात 41.7 मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात 41.6 मिमी, पालघर 41.6 मिमी, रायगड जिल्ह्यात 40.1 मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात 31.7 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कालपासून 20 जूनपर्यंतच्या राज्यातील पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये): ठाणे 41.6, रायगड 40.1, रत्नागिरी 41.7, सिंधुदुर्ग 24.2, पालघर 41.6, नाशिक 27.4, धुळे 1.5, जंढरगाव, 1.53, नानळगाव 40.1, रत्नागिरी 41.7. 8.4, पुणे 28, सोलापूर 2, सातारा 26.5, सांगली 5.4, कोल्हापूर 17.4, छत्रपती संभाजीनगर 7.2, जालना 5.5, बीड 4.8, लातूर 0.6, धाराशिव 3.3, नांदेड 3.7, परभणी, 5.6, परभणी, बुलढाणा 7.3. 11.6, वाशिम 7.6, अमरावती 12, यवतमाळ 9.7, वर्धा 10.7, नागपूर 5.9, भंडारा 3.2, गोंदिया 3.9, चंद्रपूर 2.6 आणि गडचिरोली जिल्ह्यात 1.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी 15,092 क्यूसेक, बंडगार्डन बंधारा पुणे-24,416 क्युसेक, भिमा नदी दौंड पूल विसर्ग 10,833 क्युसेक, घोड नदी घोड धरण 4,000 क्युसेक, कण्हेर धरण सातारा 500 क्युसेक, वेण्णा नदी-1,000 क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्या लागत गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून 22,345 क्युसेक, सीना नदी - सीना धरणातून 289 क्युसेक विसर्ग सुरू आहे.