logo

विविध उपक्रमांनी भाजप नेते प्रभुदास भोईर यांचा वाढदिवस साजरा

विविध उपक्रमांनी भाजप नेते प्रभुदास भोईर यांचा वाढदिवस साजरा

पनवेल : राज भंडारी

महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांचा वाढदिवस कळंबोली येथील सुधागड हायस्कूलमध्ये शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते सुरेश भोईर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे नेते बाळासाहेब पाटील, जे. एम. म्हात्रे, अविनाश कोळी यांच्यासह माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, मित्र परिवाराने उपस्थित राहून प्रभुदास अण्णा भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रभुदास (आण्णा) भोईर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांसाठी अपघात विमा पॉलिसी वाटप केली. तसेच शाळेसाठी ५० हजार रुपयांची देणगी देखील दिली. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभुदास भोईर यांच्या कार्याचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली. या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या मित्र परिवारासमोर व्यक्त होताना प्रभुदास भोईर यांनी सांगितले की, समाजकार्य आई-वडिलांकडून शिकलो असून ते रक्तातच आहे. जनतेची सेवा करत राहणार. भाजपमध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्यामुळे जनतेची कामे मार्गी लागतील, मी भारतीय जनता पक्षात आल्यानंतर मला मिळालेल्या मानसन्मानामुळे मला अधिक जोमाने काम करण्याची स्फूर्ती मिळाली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. प्रभुदास भोईर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी माजी नगरसेवक रविंद्र भगत यांनी विशेष मेहनत घेतली असल्याचेही सांगण्यात आले.

0
0 views