logo

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विविध योगासने करून क्युरीओसिटीच्या चिमूकल्यानी केला योगादिन साजरा..

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विविध योगासने करून क्युरीओसिटीच्या चिमूकल्यानी केला योगादिन साजरा.. सांगवी नांदेड येथील क्युरिओसिटी प्री प्रायमरी स्कूलमध्ये योगादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्युरिओसिटी प्री प्रायमरीचे संचालक प्रा.माधव खिल्लारे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेश पाथरकर हे होते जागतिक योगा दिनानिमित्त क्युरिओसिटी प्री प्रायमरी स्कूलच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये शाळेच्या चिमुकल्यांनी योगगुरूच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने केली. यावेळी योगाचे महत्त्व समजून सांगताना मा.गणेश पाथरकर म्हणाले की; आयुष्यात तब्येत तंदुरुस्त ठेवण्यासाठी व बुध्दी सुदृढ ठेवण्यासाठी योगा करणे गरजेचे आहे . आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.माधव खिल्लारे यांनी योगासनांची तूलना श्वशनाशी केली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आशा खिल्लारे अनुराधा काळे मिस नेहा विणकरे मिस व सेविका चढवणे मावशी आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

23
198 views