logo

गोटुल बहुउद्देशीय फाऊंडेशन, पवनारखारी' आणि 'डी. एस. स्पोर्ट्स अॅन्ड फिजिकल फिटनेस अकॅडमी, तुमसर' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.......

तुमसर, 21 जून 2025 रोजी, नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुमसर, येथे `गोटुल बहुउद्देशीय फाऊंडेशन, पवनारखारी' आणि 'डी. एस. स्पोर्ट्स अॅन्ड फिजिकल फिटनेस अकॅडमी, तुमसर' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवस श्री. छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर चे अध्यक्ष श्री. इंजि. नितिनजी धांडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेशजी देशमुख, भंडारा जिल्हा किकबॉक्सिंग अससोसिएशन चे सचिव श्री. मयुरजी नागमोते सर, क्रिकेटचे प्रशिक्षक श्री. यश वंजारी सर, तसेच 'गोटुल बहुउद्देशीय फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. दिपकजी सराटे, श्री. अक्षयजी सराटे, 'डी. एस. स्पोर्ट्स अॅन्ड फिजिकल फिटनेस अकॅडमी, तुमसरचे प्रशिक्षक श्री. राहुल महाकाळकर सर, नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथे आंतरराष्ट्रीय योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री. इंजि. नितिनजी धांडे, श्री. महेशजी देशमुख, श्री. मयुरजी नागमोते सर, श्री. यश वंजारी सर, यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुछ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. एखाद्या व्यक्तीचे जीवन पूर्णपणे बदलण्याची क्षमता योगासनांमध्ये आहे. जर तुम्ही नियमितपणे योगासने केली तर तुमचे व्यक्तिमत्वच बदलत नाही तर, तुम्हाला आनंदी आणि ताजेतवाने देखील वाटतं, असं म्हटलं जातं. असे त्यांनी योगाचे महत्व सांगितले. गोटुल बहुउद्देशीय फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि 'डी. एस. स्पोर्ट्स अॅन्ड फिजिकल फिटनेस अकॅडमी, तुमसर सर्व विध्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

30
2163 views