logo

फिर से नही चलेगा गुंडो का जंगल राज

नागपूर जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावी
मिळालेल्या माहितीनुसार
• भाजपा चिचोली (खापरखेडा) मंडळ नवनिर्वाचित विस्तारित कार्यकारणी सभा संपन्न.


शनिवार, दिनांक २१ जूनला राजहंस सभागृह पाटणसावंगी येथे भारतीय जनता पार्टी चिचोली (खापरखेडा) मंडळ नवनिर्वाचित विस्तारित कार्यकारणी सभा आमदार डॉ आशिषराव देशमुख व प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ राजीव पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

येणाऱ्या काही महिन्यात नगरपालिका, नगरपरिषद, जि. प. व पंचायत समितीच्या निवडणूका राज्यात होऊ घातल्या आहेत. याप्रसंगी सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहे. येणाऱ्या निवडणुकीत "ईट का जबाब पत्थर से देंगे", दहशतीच राजकारण, दबाबतंत्राच राजकारण, गुंडागर्दीच राजकारण संपवल्या शिवाय राहणार नाही. विजय भारतीय जनता पार्टीचा निश्चित आहे, त्यासाठी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी केले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत चुरशीची लढत होईल, असे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत.

आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी यावेळेस सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आश्वासित केले की, इथे आता भ्रष्टाचार, दहशतवाद, गुंडगिरीचे राजकारण संपविण्यासाठी सर्वांनी सोबत काम करुन सावनेर मतदार संघला नावलौकिक मिळवून देऊ आणि चांगले सावनेर बनवून दाखवू.

या वेळी कार्यक्रमात महामंत्री म्हणून नितीन गोस्वामी यांची निवड झाली, तर उज्वल करडभाजणे, रवी फुलझेले आणि प्रशांत खोरगडे हे कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळतील. उपाध्यक्ष पदावर प्रणय कुंभारे, पंकज तांदुळकर, शत्रुघ्न सावरकर, चंद्रशेखर पानतवणे, रतन ठाकूर आणि सीमा गुडदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी कमलेश भास्कर, अनुसूचित मोर्चा अध्यक्षपदी सूरज सोमकुवर आणि महिला आघाडीच्या अध्यक्षपदी छाया ढोले या नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे.

यावेळी मनोहर कुंभारे, राजीव पोतदार, सुनीलजी जालानदर आदर्श पटले, ज्ञानेश्वर गुडदे, विलास ठाकरे, किशोर मुसळे, किशोर चौधरी, रोहित मुसळे आणि मीना तायवाडे हे उपस्थित होते.

822
24239 views