logo

सीड बाॅल बनविण्याचा विक्रम ! ! ! !

ठाणे / डोंबिवली :

शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गप्रेमींसाठी एक आगळा-वेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला.

अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून केवळ ७ तासांत तीन हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून तब्बल २,०५,०८४ ‘सीड बाॅल’ तयार करून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली.

हा उपक्रम "कै. वाजपेयी बंदिस्त क्रीडांगण, के.डी.एम.सी. ग्राऊंड, रोटरी गार्डन समोर, डोंबिवली (पूर्व)" येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन सोहळा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार श्री. रविंद्र चव्हाण, मा. आमदार श्री. रमेश मोरे, मा. रोटेरियन श्री. दिनेश मेहता, मा. आयुक्त डॉ. अभिनव गोयल तसेच श्री. रमेश खरमाळे (माजी सैनिक व वनरक्षक, जुन्नर वन विभाग) या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी श्री. रमेश खरमाळे यांनी वृक्षारोपण, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सीड बाॅल संकल्पनेचे महत्त्व विशद केले.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बियाण्यांचे गोळे, ज्यांना 'पृथ्वीचे गोळे' किंवा जपानी भाषेत "नेन्डो डांगो" (粘土団子) असे म्हणतात, हे मातीच्या गोळ्यात गुंडाळलेले बियाणे असतात. उगमासाठी उपयुक्त अशी सेंद्रिय खते, बुरशी किंवा कंपोस्टसारखे घटक त्यात मिसळले जातात. हे गोळे नंतर मोकळ्या जागांमध्ये हाताने किंवा बेचकीच्या साह्याने टाकून त्या भागाचे हरितीकरण केले जाते. हे तंत्र मासानोबू फुकुओका या जपानी नैसर्गिक शेतीच्या प्रणेत्याने पुनश्च शोधून अधिक लोकप्रिय केले.

या उपक्रमात निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली तसेच वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे स्वयंसेवक श्री. वैभव पद्माकर कुलकर्णी आणि श्री . विनायक परशुराम गंधेरे यांचा सहभाग लाभला.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणारा ठरला. आपल्यापैकी प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी खारीचा वाटा उचलणे आज काळाची गरज आहे.

https://youtu.be/Qwwxb4cSCZg?si=-4n_LerDI6tvH-aw

460
19092 views
2 comment  
  • Vaibhav Padmakar Kulkarni

    सौ . स्वाती इनामदार . अरे व्वा मस्तच उपक्रम राबविला👍👌👏👏 👏

  • Vaibhav Padmakar Kulkarni

    खूप सुंदर सामाजिक बांधिलकी या सुंदर निसर्गमय प्रगतीला खूप खूप शुभेच्छा🪷 चलते रहो बढते रहो 🪷 निसर्ग विज्ञान संस्था उत्तरोत्तर प्रगतीच्या खूप खूप शुभेच्छा🪷👍 श्री . सुनील शिवडेकर .