logo

घरकुल व पट्टा वाटपाच्या मागणीसाठी AIMIM अकोला यांचा मनपा आयुक्तांशी यशस्वी भेट

शकील खान/अकोला :- शहरातील वंचित झोपडपट्टी परिसरांना प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) तसेच पट्टा वाटप योजनेत अद्यापही समाविष्ट न केल्याने, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) अकोला च्या वतीने एक प्रतिनिधीमंडळाने सोमवारी अकोला महानगरपालिका आयुक्त लहाने यांची भेट घेतली.

या वेळी प्रतिनिधीमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं की, प्रभाग क्र. ७ मधील नाजुक नगर, मरघट, संजय नगर, माशूमशाह दर्गा, मोहता मिल गौरक्षण रोड, तसेच प्रभाग क्र. १ आणि २ मधील अकोट फाईल परिसर व इतर अनेक झोपडपट्टी भाग योजनेतून वगळले गेले आहेत. शासनाच्या २०१९ च्या परिपत्रकानुसार या भागांचा समावेश करून, चतु:सीमा निश्चिती करून लाभार्थ्यांना अधिकृत पट्टे देणे आवश्यक आहे.या मागणीवर आयुक्त लहाने यांनी त्वरित दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी चर्चेसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

निवेदन देताना AIMIM अकोला तर्फे खालील कार्यकर्ते उपस्थित होते:
आसिफ अहमद खान, जावेद पठान, अब्दुल साजिद, अब्दुल रझिक, फिरोज खान, मोहम्मद इरशाद, शेख आसिफ, मोहम्मद अन्वेज़, मोहम्मद तालिब, शेख सद्दाम, मोहम्मद उबैद, नदीम पठान, शेख हम्जा, शेख रब्बानी, शेख वसीम, अब्दुल रफिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

27
578 views