logo

जनता विद्यालयात नव्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत .

जनता विद्यालयात नव्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

पिंपळगाव सराई | दि. २३ जून २०२५
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव सराई येथे आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला.

वाद्यांच्या गजरात, फुलांच्या सडा आणि टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच गावातील मान्यवर मंडळींच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.

शालेय मैदानाच्या प्रवेशद्वारापासून ते मंचापर्यंत रंगीबेरंगी सजावट करण्यात आली होती. नवीन विद्यार्थ्यांसाठी स्वागत मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे हर्षोल्हासाने स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमामध्ये नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील सर्व क्रमिक पुस्तके वाटप करण्यात आली. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

मंचावर मान्यवर म्हणून शाळा सल्लागार समिती अध्यक्ष श्री. मदनराव गवते, प्राचार्य श्री. प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक श्री. संजय पिवटे तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. सुदाम चंद्रे व सौ. वंदना लकडे यांनी तर आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक श्री. गजानन पाटोळे यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन पाचवी आणि आठवीच्या सर्व वर्गशिक्षकांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.

79
2775 views