logo

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरी (चिखली) चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल...!

काटोल प्रतिनिधी -खैरी (चिखली)- जि. प. प्रा.शाळेत उमटले चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल.....!
खैरी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक सत्र २०२५-२६ चा प्रारंभ प्रवेशोत्सव आणि पहिले पाऊल उपक्रमांतर्गत पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडून गावात प्रभात फेरी काढून इयत्ता पहिली प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे पाऊल ठसे घेऊन पुष्पगुच्छ देऊन मिष्ठान्न खाऊ देत अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश तसेच नवीन जुते व मोजे वाटप करण्यात आले. अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती च्या सौ. मिनाक्षी मोहन मानमोडे, ग्रामपंचायत सदस्य अंकित दशरथ रंगारी, वर्षा ध. ढोले मुख्याध्यापिका सौ.नलिनीताई उमाजी भोयरकर सह शिक्षक मिलिंद वाहाणे,माजी ग्रामपंचायत कर्मचारी देवानंदजी गोडबोले अंगणवाडी सेविका चंदाताई निंभोळकर मदतनीस दिपालीताई डोंगरे व खैरी येथिल पालकवर्ग व ग्रामस्थ उपस्थित हो याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य खैरी अंकित दशरथ रंगारी यांनी मार्गदर्शन केले व मुख्याध्यापिका नलिनीताई भोयरकर यांनी आभारप्रदर्शन केले.

47
4971 views