logo

आज प्राथमिक शाळा केंद्र क्रमांक सहा माळीनगर मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तरांची वाटप करण्यात आली

आज प्राथमिक शाळा क्रमांक सहा माळीनगर मध्ये.. सौ. सिद्धी शुभम लडकत यांचे कडून आणि सौ. ज्योतीताई जितेंद्र लांडगे यांच्या शुभहस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.. तसेच प्राथमिक शाळा क्रमांक एक माळीनगर च्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती बोरुडे मॅडम, कंगळे मॅडम, शाळा नंबर एकच्या माजी मुख्याध्यापिका सौ. लोखंडे मॅडम, सौ. सावंत मॅडम उपस्थित होत्या.. बोरुडे मॅडम आणि सावंत मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.. तसेच श्री.जितेंद्र भाऊ लांडगे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले.. श्रीमती बोरुडे मॅडम आणि सौ लोखंडे मॅडम यांनी प्राथमिक शाळा क्रमांक सहा या शाळेसाठी दोन ग्रीन बोर्ड भेट म्हणून दिले. तसेच प्राथमिक शाळा क्रमांक एकचे माजी मुख्याध्यापक श्री. शिवाजी सावंत साहेब यांनी ऑफिस साठी कार्पेट भेट म्हणून दिले.. आदरणीय कंगळे मॅडम यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि बिस्किटांचा खाऊ दिला.. सर्व दानशुरांचे प्राथमिक शाळा क्रमांक सहा च्या वतीने आणि संस्थेच्या वतीने खूप खूप आभारी आहोत.. उपस्थित सर्व विद्यार्थी - पालक- मान्यवर यांना चटकदार मिसळपाव ची मेजवानी देण्यात आली. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्या साठी शाळेच्या मुख्याध्यापिका कुदळे मॅडम, कोळी सर ,गिड्डे ताई यांनी परिश्रम घेतले... शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली..

36
963 views