
कळमेश्वर शहरातील कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटला
नागपूर जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावी
नागपूर कळमेश्वर
मिळालेल्या माहितीनुसार
*कळमेश्वर रेल्वे गेटवर लवकरच होणार उड्डाणपूल..! — आमदार डॉ. आशिषराव देशमुख*
कळमेश्वर शहरातून औद्योगिक वसाहतीकडे (एमआयडीसी) जाणाऱ्या मार्गावर असलेल्या रेल्वे गेटवरील वाढत्या वाहतूक कोंडी व नागरिकांच्या तक्रारींचा सकारात्मक निकाल लागला आहे. या रेल्वे गेटवर उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी दिली.
या संदर्भात आज नागपूर येथील रेल्वे विभागीय आयुक्तांशी आमदार डॉ. देशमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत कळमेश्वर रेल्वे गेटमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचे आणि नागरिकांच्या अडचणींचे सविस्तर विवेचन करण्यात आले.
दररोज हजारो कामगार, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना या गेटमुळे अनेक तास वाहतुकीत अडकावे लागत होते. कामावर उशिरा पोहोचणाऱ्या कामगारांवर शिस्तभंगाची कारवाई होत होती, तर रुग्णवाहिकांमध्ये गंभीर रुग्ण असतानाही वेळेवर उपचार मिळवणे कठीण जात होते. यामुळे शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक मोठे प्रश्न निर्माण झाले होते.
या सर्व गोष्टींचा सखोल आढावा घेऊन, आमदार डॉ. देशमुख यांनी प्रभावीपणे रेल्वे प्रशासनासमोर मागणी मांडली आणि अखेर उड्डाणपूल मंजूर करून घेतला.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबणार, रुग्णवाहिकांचा मार्ग मोकळा होणार, कामगार वेळेवर पोहोचू शकणार, वाहतुकीची सुसूत्रता वाढणार असून संपूर्ण परिसराला दिलासा मिळणार आहे.
या सकारात्मक निर्णयाबद्दल कळमेश्वर व परिसरातील नागरिकांनी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांचे आभार मानले असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
*कळमेश्वर यार्ड (कळमेश्वर एमआयडीसी गेट) मधील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक २८९ च्या जागी बांधलेल्या रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) बद्दल तपशील-*
१) नागपूर विभागातील नरखेड-आमला विभागातील कोहळी आणि कळमेश्वर स्थानकांदरम्यान रेल्वे किमी. १०१८/२-४ येथील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक २८९ ला महाराष्ट्र राज्य सरकारसोबत रेल्वे कार्य कार्यक्रम पिंक बुक २०१९-२० मध्ये खर्च वाटपाच्या आधारावर कमी उंचीच्या सबवे (LHS) सह रोड ओव्हर ब्रिज (ROB) बांधून काढून टाकण्यास मंजुरी अवस्थेमध्ये आहे. (UID: ०१.००.३०.१९.१.११.००१)
२) सुरुवातीला रेल्वेच्या बांधकाम संस्थेकडून काम सुरू होते. रेल्वे भागाच्या आरओबीसाठी डिझाइन आणि रेखाचित्रासह प्रकल्पाचा जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग (जीएडी) तयार करण्यासाठी निविदा मंजूर करण्यात आली आहे. प्रस्तावाचा जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग (जीएडी) मध्य रेल्वे (सीआर) मुख्यालय (मुख्यालय) कडून मंजुरी अंतर्गत आहे. जीएडीचे निरीक्षण सीआर मुख्यालय कडून कळवले जाते.
३) आता हे काम पुढील मंजुरी आणि अंमलबजावणीसाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम), रस्ते सुरक्षा प्रकल्प [CAO(C)RSP] मध्य रेल्वे (CR) मुख्यालय (HQ) कडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
या वेळी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत संदीप उपाध्याय, सोनू नवदिंगे, तुषार उमाटे, गौरव मंगरूळकर, राजू वऱ्हाडे, आशिष फुटाणे, सुनीलजी जालानदर, नितीन गोस्वामी उपस्थित होते.