logo

आरटीओ चा निरीक्षक लाचेच्या जाळ्यात एजंटमार्फत १८ हजार घेताना पकडले



छत्रपती संभाजीनगर: ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत असलेल्या तक्रारदाराला तुरीची डाळ व इतर कडधान्याची वाहतूक करताना ओव्हरलोडची कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी खासगी एजंटमार्फत १८ हजार रुपयांची लाच घेताना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपींमध्ये मोटार वाहन निरीक्षक राजू मुरलीधर नागरे (वय ३९, रा. नाशिक) आणि एजंट संदीप रामदास ढोले (रा. साईदीपनगर, बीड बायपास) यांचा. समावेश आहे. तक्रारदाराचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून, त्याच्या मालकीचे आयशर कंपनीचे सहा चाकी वाहन आहे. या वाहनाने तक्रारदार हे तुरीची डाळ व इतर कडधान्याची जालना ते मुंबई अशी वाहतूक करतात.

हे वाहन छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीतून सुरळीत चालू द्यायचे असेल व वाहनावर ओव्हरलोडची कारवाई होऊ द्यायची नसेल तर खासगी एजंट संदीप ढोलेने वाहन निरीक्षक नागरे याच्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी अहिल्यानगरच्या एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार पथकाने लाचेची पडताळणी केली. त्यात तडजोडीअंती १८ हजार रुपयांत व्यवहार ठरला.

10
397 views