logo

विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांकडून दंड वसूल

परभणी। कोरणा विषाणू च्या दुसऱ्या लाटेने तालुक्यामध्ये दिवसेंदिवस रुग्ण सापडत असल्यामुळे तालुका प्रशासनाच्यावतीने कडक अंमलबजावणी राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने 27 एप्रिल रोजी कापड दुकान, पानपट्टी, हॉटेल व हार्डवेअर या चार दुकानावर व बिना मास्क फिरणाऱ्या तीन नागरिकांवर महसूल व न. प. च्या संयुक्त पथकाने दंडात्मक कार्यवाही करीत असत 3 हजार 770 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला या कार्यवाहीमुळे शटर उघडे  करून व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये कोरोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे मात्र शहरातील लोकमान्य अण्णाभाऊ साठे चौकातील न. प.शॉपिंग सेंटर मध्ये चोरीचोरीचुपके कापड दुकान बंद करून आतून कपडे विक्री करीत होते  त्याच प्रमाणे हार्डवेअर ,हॉटेल व पानपट्टी अशाच प्रकारे सुरू होती अचानक महसूल व न. प. भरारी पथकाने सदर दुकानावर छापा टाकला असता चार दुकाने व विना मास्क फिरणाऱ्या तीन जनावर असा एकूण तीन हजार 770 रुपयांचा दंड वसूल करून संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही केली आहे सदर कार्यवाही तहसीलदार डॉ.अशिष कुमार बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार ऐश्वर्या गिरी अव्वल कारकून नारायण पिंपळे ,शिवाजी शिंदे ,प्रवीण तोडकर न. प.चे पंडित कदम, श्रीकांत कराड, संदीप पोरे आदी सहभागी झाले होते.

126
17968 views