
डी डी एन यु २ हावरगांव कारखान्याचा मील रोलर पुजन संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:- विकास वाघ धाराशिव मो 9657670765
कळंब-धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या आपल्या DDN SFA U-२ कै.डॉ.चंद्रकलादेवी पाटील नगर, हावरगाव ता. कळंब या कारखान्याच्या सन २०२५-२६ हंगामासाठी मिल रोलर पूजन चेअरमन श्री. दिलीपदादा नाडे आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री लक्ष्मी पूजन करण्यात आले.
सन २०२५-२६ गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने गाळप करण्याचे नियोजन सुरु असून मशिनरी ओव्हरहॉलिंगची कामे गतीने सुरू आहेत. कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी पिकविलेला सर्व ऊस कारखान्याकडे गळीतासाठी द्यावा, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. दिलीपदादा नाडे यांनी केले.
यावेळी कार्यकारी संचालक श्री. विजय बापू नाडे, श्री.सतीश दंडनाईक, श्री.अभय नाडे, श्री.अक्षय नाडे, श्री.अजित पिंगळे, श्री.रामहरी शिंदे, श्री.विकास बारकूल, श्री.अरुण चौधरी, श्री.दत्ता साळुंके, श्री.प्रणव चव्हाण, श्री.वैभव मुंडे, श्री.मदन बारकूल, श्री.भागचंद बागरेचा, श्री.आरके भाऊ कोल्हे, श्री.शिवाजीराव गिड्डे, कारखान्याचे कार्यकारी संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.