logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) ची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी...सामाजिक न्याय निधी पळवून लाडक्या बहिणीसाठी वर्ग... अन्यायकारक कृती.


नवी मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दीपक भाऊ निकाळजे यांच्या स्पष्ट आदेशानुसार, सामाजिक न्याय विभागासाठी मंजूर करण्यात आलेला निधी "लाडकी बहिण योजना" व तत्सम इतर योजनांसाठी इतर विभागांकडे वळवला गेला, यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हा निधी अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी निर्धारित करण्यात आला होता, परंतु तो इतरत्र वळवल्याने या समाजावर अन्याय झाल्याचे आरपीआय (A) चे नेते बाळासाहेब पवार कैलास जोगदंड दादासाहेब ओहळ तानाजी मिसळे यांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तातडीने निवेदन देण्याचे आदेश कोकण विभागाच्या प्रमुखांमार्फत दिले होते. त्यानुसार, मुख्यमंत्री कक्ष कोकण विभाग यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, सामाजिक न्याय विभागाचा मूळ निधी त्वरित पुनर्वापरासाठी त्याच विभागाकडे वर्ग करण्यात यावा, जेणेकरून मागासवर्गीय घटकांना न्याय मिळेल आणि त्यांच्या कल्याणासाठीच्या योजना पूर्ववत राबवता येतील अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.

या निवेदनप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे वरिष्ठ पदाधिकारी आणि नवी मुंबई समितीचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य संघटक विनोद इंगळे, नवी मुंबई समिती जुने वरिष्ठ पदाधिकारी संघटक सुदत्त खरात, संपर्क प्रमुख प्रतीक यादव, अध्यक्ष गायकवाड साहेब कार्याध्यक्ष योगेश गोरे ,उपाध्यक्ष मिलिंद राऊत शिवराज रामपुरे कामगार सेल अध्यक्ष अमोल जावळे महिला अध्यक्ष बेबीताई गायकवाड, प्रकाश पवार आणि इतर शेकडो पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

आरपीआय (A) ने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर हा निधी लवकरात लवकर परत सामाजिक न्याय विभागाला वर्ग करण्यात आला नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल. सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून इतर योजनांचा बोजा उचलणे ही घटनात्मक मूल्यांवर थेट गदा आणणारी बाब असल्याचे पक्षाचे मत आहे.

133
615 views

Comment