logo

गहिवरून गेलेला क्षण , श्री. प्रमोद धोंडीराम वाघमोडे यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन ,

ठाणे – दैनिक स्पोर्ट्स प्लस चे सहसंपादक,प्रसिद्ध क्रीडा शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मुंबई विभाग संपर्क प्रमुख तथा ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोद धोंडीराम वाघमोडे यांच्या मातोश्रीं फुलाबाई धोंडीराम वाघमोडे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 75 व्या वर्षी दिनांक 27 जून 2025 रोजी दुःखद निधन झाले. त्या अत्यंत प्रेमळ, कष्टकरी व धैर्यशील व्यक्तिमत्त्वाच्या होत्या.
त्यांच्या निधनामुळे वाघमोडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या मुलावर नितांत प्रेम करणाऱ्या मातोश्री, त्याचा प्रत्येक टप्प्यावर आधार बनून राहिल्या. श्री. प्रमोद वाघमोडे यांना लहान वयात मधुमेह झाल्याने, त्या कायम काळजीपूर्वक साथ देत असत. त्यांनी आपल्या मुलाच्या प्रत्येक यशात सहभागी होत त्याचे मनोबल उंचावले.
अत्यंत भावनिक अशा या घटनेनंतर श्री. वाघमोडे यांनी सांगितले की, “आई गेली… आणि सारं जग थांबल्यासारखं वाटतं. घर सगळ्यांनी भरलंय… पण तीच नाही, जिने हे स्वप्न पाहिलं होतं.”
अंत्यसंस्कार ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्या मूळ गावी रेवनाळ तालुका जत जिल्हा सांगली येथे संपन्न झाले. वाघमोडे कुटुंबीयांप्रती सर्व स्तरातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
रक्षा विसर्जन रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी सकाळी सात वाजता करण्यात येणार आहे.

117
28770 views