logo

Hingoli News : रात्री पती-पत्नी एकत्र झोपलेले, सकाळी उठल्यावर सर्व काही संपलेलं, हिंगोलीत काय घडलं? Hingoli Marsthi New

Hingoli News : रात्री पती-पत्नी एकत्र झोपलेले, सकाळी उठल्यावर सर्व काही संपलेलं, हिंगोलीत काय घडलं?
Hingoli Marsthi News : हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने धक्कादायक आत्महत्या केली आहे. हिना संदीप जोंधळे (35) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.गजानन पवार, हिंगोली : हिंगोलीमध्ये दिवसेंदिवस आत्महत्येच प्रमाण वाढताना दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी विद्यार्थीनीनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. तर दुसरीकडे आज वसमत शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी (27) रोजी शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचारी असलेल्या संदीप जोंधळे यांच्या पत्नी हिना संदीप जोंधळे (35) असं या मयत महिलेचे नाव आहे.हर्ष नगर भागात राहत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीने आपल्या घराच्या व्हरांड्यात गळफास घेतल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये वसमत शहर पोलिसांचे पथकाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले होते. वसमत शहरातील हर्षनगरात जोंधळे परिवार आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत आई, पत्नी एक मुलगा एक मुलगी असा हा जोंधळे परिवार असून त्यांनी नुकतंच आपलं या भागात नवीन घराच बांधकाम केले आहे.रात्री सर्व परिवार झोपेत असताना पोलिसाची पत्नी असलेल्या हिना यांनी टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सकाळी संदीप यांना जाग आली तर घरात आपली पत्नी दिसत नाही म्हणून त्यांनी घराच्या सभोवताली, परिसरामध्ये पाहिले असता हिना यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

0
46 views