logo

स्थानिक गुन्हे शाखेचे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे*


श्रीरामपूर तालुक्यातील अवैध सुरू असलेल्या १० हातभट्टी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून तीन हजार २०० लीटर कच्चे रसायन व ३८५ लीटर हातभट्टी दारू असा एकूण ३ तीन लाख ९७ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
*तीन हजार २०० लीटर कच्चे रसायन नष्ट*
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार आहेर यांना श्रीरामपूर तालुक्यात अवैध हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने १० ठिकाणी छापा टाकून तीन हजार २०० लिटर कच्चे रसायन नष्ट केले. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळे १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदिवे, संदीप दरंदले, रमीजराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ व उमाकांत गावडे यांनी केली.

0
99 views