logo

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळखांबी येथे पालखी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळखांबी येथे पालखी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. सदर सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम पालखीचे पूजन करण्यात आले. नंतर पालखीचे प्रस्थान झाले. यामध्ये श्री विठ्ठल, रुक्मिणी, तुकाराम इत्यादी संतांचा मुलांनी वेशभूषा करून सदर पालखी सोहळ्यामध्ये भाग घेतला होता. नंतर पालखी माळखांबी गावामध्ये नेऊन मंदिरामध्ये पालखीचे पूजन करण्यात आले. तसेच गावातील सर्व भक्तमंडळी सदर दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले वेगवेगळ्या प्रकारचे खेळ फुकडी, गोल रिंगण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. पालखी सोहळ्यामध्ये सर्व ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. शेवटी सर्व कार्यक्रम झाल्यानंतर पालखी सोहळा परत शाळेमध्ये येऊन विसावला.

89
2342 views